▪️सफाई कामगारांच्या सत्करातून प्रेरणा घ्यावी : सरपंच भास्कर बुरे

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : गावातील सार्वजनिक स्वच्छता नित्यनेमाने करीत इतरांना स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे सफाई कामगार यांच्या सत्कारातून इतरांनी प्रेरणा घेत स्वच्छता पाळावी असे प्रतिपादन सरपंच भास्कर बुरे यांनी केले.
चामोर्शी तालुक्यातील मुरखळा ( माल )येथील ग्रामपंचायत सफाई कामगार माणिक घोगरे यांचा ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सोमवारी २९ सप्टेंबर रोजी आभाकार्ड देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी सरपंच भास्कर बुरे बोलत होते.यावेळी उपसरपंच लक्ष्मी सालोरकर ,ग्रामपंचायत सदस्य अर्चना नैताम,पुष्पा गव्हारे,लोकेशसोमनकर,योगराज बुरे,तंमुस अध्यक्ष प्रभाकर पोटे,ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र बारसागडे,ग्रामपंचायत कर्मचारी शामरावनिशाणे ,सचिन तुंबडे,राकेश नैताम,सुषमा गेडाम,आदी उपस्थित होते.पुढे बोलताना सरपंच भास्कर बुरे म्हणाले महाराष्ट्र शासन यांच्या वतीने १७ सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढ दिवसापासून ते २ ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दरम्यान सेवा पंधरवडा हा राबविण्यात येतो .यादरम्यान गांधीजींच्या सेवाभावाचा आणि मोदींजीच्या विकासाभिमुखतेचा संगम या उपक्रमातून साधला जात आहे.या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन याप्रसंगी केले .कार्यक्रमाचे संचालन व आभार शामराव निशाणे यांनी केले.



