ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️जिमलगट्टा शासकीय आश्रम शाळेत 10वी व 12विच्या विध्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.

 

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

अहेरी – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील जिमलगट्टा
शासकीय आश्रम शाळा जिमलगट्टा येथे वर्ग 10 वी व 12 वी च्या विध्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. या प्रसंगी आज निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शैलेंद्र कावळे सर, प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ शिक्षक श्री. कुसराम सर, कु. जांभुळकर मॅडम, श्री. डोके सर, श्री. कोडापे सर, चकिनारपू सर, कु. आत्राम मॅडम, कु. लामगे अधिक्षिका उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरानी विध्यार्थ्यांना होणाऱ्या परीक्षे संदर्भात मोलाचे मार्गदर्शन करून भविष्यात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक कावळे सर यांनी विध्यार्थ्यानी शिक्षक हे गुरू असल्याने शिक्षकांचा आदर नेहमी करून चौकस बुद्धीने स्वतःचा विकास करावा असे अनमोल मार्गदर्शन करण्यात आले आहे, या वेळी शाळेचे संपूर्ण शिक्षक, शिक्षिका, विध्यार्थी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.