▪️निवडणूक आयोगाचे साफ्टवेअर अकार्यक्षम आहेत काय ?
▪️पत्रकार परिषदेत काँग्रेसचा आरोप.. निवडणूक आयोगाने दखल घेणे गरजेचे..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो.क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर मतदारसंघात १६०० मतदारांचे नाव दोन-दोनदा मतदार यादीत समाविष्ट असल्याचे निदर्शनास आले असून निवडणूक आयोगाला याबाबत स्पष्टीकरण मागितले असता ते दिले गेले नाही आणि आता मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असताना प्रारुप यादी करुन तयार ती प्रसिद्ध केली. त्यातही १२२मतदारांची नांवे दोन- दोनदा आल्याचे आढळून आले आहे.
एकीकडे हा प्रकार सुरू आहे तर दुसरीकडे एका प्रभागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचे नाव दुसऱ्याच प्रभागात समाविष्ट करण्यात आले असल्याचेही निदर्शनास आले आहे.
प्रभाग रचना करतानाही एका प्रभागात १६०० तर दुसऱ्या प्रभागात २६०० मतदारांचा सहभाग ही अत्यंत आक्षेपार्ह बाब असल्याचे मत उपस्थित पदाधिकारी यांनी नोंदविले.
याशिवाय मृत मतदारांची नावे अजूनही या यादीत असल्याचे व बरेच मतदार गाव सोडून परगावी गेले असतांनाही त्यांची नावे वगळण्यात आली नसल्याने या बाबींची गांभीर्याने दखल घेऊन निवडणूक आयोगाने ही नावे वगळण्यात आली पाहिजे अशी मागणी करताना अशा प्रकारांमुळे प्रत्यक्ष निवडणुकीवर यांचा परिणाम होणार असल्याचे व यामुळे निकाल बाधित होऊ शकतो असेही मत त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी १०६३६पुरुष मतदार व १११०९स्त्री मतदार असे एकूण २१७४५ मतदार यादीत समाविष्ट असल्याचे स्पष्ट केले.
मूल नगरपरिषद क्षेत्रात एकाच घरच्या दोन मतदारांचे दोन वेगवेगळ्या मतदान केंद्रावर नांव असल्याची बाबही त्यांनी पुन्हा एकदा उजागर केली आणि उपस्थित पत्रकारद्वयांनी असे आपल्या बाबतीत घडले असल्याचे मान्य केले, त्यामुळे सुशिक्षित आणि सजग मतदारांचे बाबतीत असा प्रकार घडत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना किती त्रास सहन करावा लागत असेल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आणि आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात निवडणूक आयोगाचे साफ्टवेअर अकार्यक्षम आहेत काय असा सवालही उपस्थित केला.
काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या अभियानात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि आमचे नेते संतोष रावत यांच्या सुचनेनुसार आम्ही आज ही पत्रपरिषद आयोजित केली असून राजकीय भेदाभेद दूर ठेवून सर्वसामान्य मतदारांना सोयीस्कर होईल या पद्धतीने प्रभागांची रचना व त्या प्रभागातील मतदारांची संख्या निश्चित करुन मतदारांना , घरातील एका कुटुंबातील सदस्यांना इकडे तिकडे मतदानाच्या दिवशी भटकावे लागणार नाही यासाठी निवडणूक आयोगाने आणि प्रशासनाने उचीत कार्यवाही करावी अन्यथा ही दुरुस्ती करण्यासाठी आम्हाला जनआंदोलन उभारावे लागेल असा इशारा त्यांनी याप्रसंगी दिला.
स्थानिक विश्राम गृहात आयोजित या पत्रपरिषदेला मूल शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील शेरकी, तालुका काँग्रेस अध्यक्ष गुरू गुरनुले,कृ.उ.बा.समिती मूलचे सभापती राकेश रत्नावार,माजी सभापती घनश्याम येनुरकर, युवा काँग्रेस अध्यक्ष पवन निलमवार, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष रुपाली संतोषवार, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष नलिनी अडपवार, माजी जि.प.सदस्या मंगला आत्राम आदी पदाधिकारी उपस्थित होते.



