▪️भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 07 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Service (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे 19 जानेवारी ते 3 एप्रिल 2026 या कालावधीत प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन, आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे 14 जानेवारी 2026 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर, पुणे (DSW) यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन (Other-PCTC Nashik CDS-६६) कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे. सदर वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खालील नमूद पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधिचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावे.
पात्रता : उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवाराने केंद्रीय लोकसेवा आयोग नवी दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस परीक्षेकरीता ऑनलाईद्वारे अर्ज केलेला असावा.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0253, 2451032 किंवा व्हॅाटसअप क्र. 9156073306 (प्रवेश पत्र मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, चंद्रपूर यांनी केले आहे.



