▪️जिल्हाधिकारी कार्यालया समोर“ संसदेत नरेंद्र गायब, देश से सिलेंडर गायब” “जनतेची लूट थांबवा..
▪️चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने.. जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने गॅस दरवाढ व सिलेंडर तुटवड्याविरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालया समोर“संसदेत नरेंद्र गायब, देश से सिलेंडर गायब” “जनतेची लूट थांबवा,गॅस दर कमी करा ”धोरण मोदीचे मरण सर्वसामान्यांचे “ सिलेंडर तुटवडा नियमित करा “ अश्या घोषणा देत चुली पेटवून हातावर भाकरी थापूण मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला.
देशात व राज्यात निर्माण झालेल्या LPG गॅस टंचाईमुळे कोट्यवधी नागरिक त्रस्त झाले असून घरगुती गॅस उपलब्ध होत नसल्याने लाखो कुटूंबाना अडचणींना सामना करावा लागत आहे. गॅस एजन्सीने घरपोच सिलेंडर देणे बंद केल्याने गॅस मिळविण्यासाठी सकाळ पासून उन्हात लोकांना लांबचलांब रांगा लावा लागत आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री केंद्रीय पेट्रोलियन मंत्री सांगत आहे गॅस तुटवडा नाही. मग लोक सिलेंडर घेऊन रांगा का लावत आहे.
कमर्शीयल गॅस उपलब्ध होत नसल्याने अनेक खानावळी, हॉटेल, व रेस्टॉरंट बंद पडलेले
असल्याची परिस्थिती असून, याबाबत सरकार मात्र दुर्लक्ष करत असल्याचा टीका बेबीताई उईके यांनी केली.
जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या प्रश्नावर केंद्र सरकारने तात्काळ उपाययोजना कराव्यात, LPG गॅसचा पुरवठा सुरळीत करावा ,गॅस दर कमी करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अश्या मागणीचे निवेदन व जिल्हाधिकारी मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले यावेळी उपस्थित ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल मस्की आदिवासी सेल शहर जिल्हाध्यक्ष जाणार्धन गेडाम, अल्पसंख्याक सेल शहर जिल्हाध्यक्ष बब्बूभाई ईसा,युवक जिल्हाकार्याध्यक्ष संजय ठाकूर , विधानसभा अध्यक्ष सूरज चव्हाण, विध्यार्धी शहर जिल्हाध्यक्ष परब गिरडकर, शहर उपाध्यक्ष दिपक कटकोजवार, शहर सचिव रुपेश मुलकावार, शहर सरचिटणीस मनिष मोडक, शहर संघटक सचिव अरविंद परचाके, अरविंद माहूरपवार शादीक शेख, अनुप बेले,सिद्धार्थ मेसराम,महेंद्र शेरकी, वामन वाडगुरे, नीलकंठ येरमे, ऋतिक धकाते ,कृष्णा सहारे, अनिकेत कुंभारे सचिन पुंजारे गोपाळ वैद्य, जोगी नैताम,शोभा घरडे राणी बोरा, लता जांभुळकर, सुनंदा महाते ,वैशाली चांदेकर ,कविता धकाते ,सरस्वती गावंडे ,सुनीता नन्नावरे, किरण मडावी ,सुनीता ठाकरे ,सारिका बुरांडे ,प्रीती गायकवाड, यशोधरा उईके, रेशमा मेसराम ,सुनीता मडावी,स्नेहा रामटेके, अन्य कार्यकर्ते पदाधिकारी आंदोलनात सहभागी होते.



