सुगंधित तंबाकू तस्कराकडून 6 लाखांचा मु्द्देमाल जप्त..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
अहेरी – ( इंडिया 24 न्युज ) : अहेरी कारमधुन प्रतिबंधित सुगंधित तंबाखुची तस्करी केली जात असल्याचे निदर्शनास येतात अहेरी पोलिसांनी भामरागड मार्गावर सापळा रचुन तस्काराकडुन 6 लाख 16 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना सोमवार 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजत्याचा सुमारास करण्यात आली याप्रकरणी शंकर माय्यालु भिमराजुलवार 36 रा. सावरकर चौक आलापल्ली याला अटक करण्यात आली असून प्रितम राजेश पेटेवर 30 रा. श्रमिक नगर आलापल्ली ता. अहेरी हा फरार झाला आहे प्रतिबंधित सुगंधित तंबाखुची तस्करी केली जात असल्याचे माहिती मिळताय अहेरी पोलिसांनी भामरागड मार्गावर सापळा रचला. एम. एच 33 ए 4301 क्रमांकाची कार येताच तिला अटकाव केला पोलिसांनी कारची झडती घेतली असता पांढर्या रंगाच्या चुंडीमध्ये मजा हुक्का शिशा तंबाकूचे 40 डब्बे व अन्य 7 चुंगळयामध्ये 280 मजा डब्बे आढकून आले पोलिसांनी 3 लाख 16 हजार 400 रुपयांचा प्रतिबंधित तंबाखु तसेच 3 लाख रुपए किमतीचे वाहन असा एकंदरीत 6 लाख 16 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली पोलिसांनी आरोपिविरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास अहेरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी महीला पोलिस उपनिरीक्षक दिपाली कांबळे करीत आहेत.



