▪️गडचांदूर येथे आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप..
▪️आमदारांच्या प्रयत्नांना यश, नागरिकांना दिलासा..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
गडचांदूर – ( इंडिया 24 न्युज ) : गडचांदूर शहरातील अनेक वर्षांपासून अतिक्रमण धारक म्हणून राहत असलेल्या हनुमान गुडा प्रभाग क्र.९ मधील नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या नागरिकांना शेवटी दिलासा मिळाला असून त्यांच्या हस्ते (दि.३) ला १० अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी आमदार देवराव भोंगळे म्हणाले “गेल्या अनेक वर्षांपासून गडचांदूर नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या हनुमान गुडा प्रभाग क्र.९ मध्ये अतिक्रमण धारक नागरिक आपल्या घराच्या मालकी हक्कासाठी लढा देत होते. त्यांचे हे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. नागरिकांना स्वतःच्या घराचा कायदेशीर हक्क मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. शासनाच्या धोरणांचा योग्य उपयोग करून आम्ही हे शक्य केले असून पुढेही अशा नागरिकाभिमुख निर्णयांसाठी कटिबद्ध राहू.” असेही आमदार भोंगळे यांनी सांगितले.
अनेक वर्षे अतिक्रमण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घरांवर आता अधिकृत मालकी हक्क मिळाल्यामुळे नागरिकांना शासनाच्या विविध योजना, सुविधा आणि इतर नागरी सोयीं मिळणार आहे. त्यामुळे गडचांदूर शहरातील अतिक्रमण धारक नागरिकांना दिलासा मिळाला असून नागरिकांनी आमदार भोंगळे यांचे आभार मानले.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, राजुराचे तहसीलदार ओमप्रकाश गोंड, कोरपनाचे तहसीलदार पल्लवी आखरे, भूमिअभिलेख उपअधिक्षक सोनावणे, मुख्याधिकारी आशिष चव्हाण, भाजपाचे तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, शहराध्यक्ष अरविंद डोहे, सतीश बेतावार, धर्मेंद्र सिंग, विक्की उरकुडे, रोहन काकडे, विवेक भेदुरकर, जयंता भोंगळे, हरी घोरे, धर्मेंद्र छाजेड, योगेश बांदुरकर, यांचेसह भाजपा कार्यकर्ते व गडचांदुर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

