▪️अजिंक्य प्रकाश पाटील युवा पिढीचे नेतृत्व परंपरेच्या वारसातून नव्या नेतृत्वाची उंच भरारी..
▪️मारोडा-राजोली जि. प. क्षेत्रातून दावेदारी..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल ( इंडिया २४ न्यूज ) : जिल्हा परिषद चंद्रपूर च्या जि. प. गटा साठी चे आरक्षण सोडत कार्यक्रम नुकताच पार पडला.मूल तालुक्यातील मारोडा-राजोली जिल्हा परिषद क्षेत्र नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्व साधारण गटासाठी आरक्षित आहे.
या क्षेत्रातून मूल तालुक्यातील राजगड या गावाच्या मातीत जन्मलेले श्री. अजिंक्य प्रकाश मारकवार हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. अजिंक्य पाटील हे जिल्हा परिषद चंद्रपूर चे माजी अध्यक्ष श्री. प्रकाश पाटील यांचे चिरंजीव आहेत. अजिंक्य पाटील यांना राजकीय आणि सामाजिक वारसा लाभलेला आहे.
अजिंक्य पाटील यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य फारच वाखानन्याजोगे आहे. ते केवळ राजकीय पातळीवर नाही तर सामाजिक शैक्षणिक कार्यातही नेहमीच अग्रेसर आहेत. त्यांनी जनप्रकाश पदयात्रेचे आयोजन करून महागाई, बेरोजगारी, शिक्षण आणि आरोग्य इत्यादी प्रश्नांना वाचा फोडली. त्यांच्या अंगी शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि बेरोजगार यांच्या बाबत तळमळ आहे. अजिंक्य पाटील हे नेहमीच शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवीण्यासाठी प्रयत्नरत असतात.
अजिंक्य पाटील हे केवळ नाव नाही, तर ते समाजकारण, शिक्षण आणि जनसेवेची परंपरा पुढे नेणारे आभाळा एवढे युवा नेतृत्व आहे. B. E., M. B. A. उच्च शिक्षण घेतल्या नंतरही त्यांची नाळ मूल तालुक्यातील मातीशी जुळून आहे. त्यांनी काढलेल्या जनप्रकाश यात्रेच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, बेरोजगारांच्या आणी जेष्ठ नागरिकांच्या अडी अडचणी याविषयी वाचा फोडली.
जातीनिहाय जनगणना, लोक संख्येच्या प्रमाणात शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण, शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य वाटप, शेतकऱ्यांच्या धानाला योग्य हमी भाव, शेतकरी कर्जमाफी, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार, घरकुलाचे अनुदान वाढविणे, वन जमिनीचे स्थायी पट्टे देणे इत्यादी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न अजिंक्य पाटील यांनी शासन स्तरावर संवादातुन तसेच निवेदने देऊन अनेकदा केला. सरकारी शाळा आणि शैक्षणिक संस्था यांचे खाजकीकरण होऊ नये, यासाठी अनेकदा आवाज उठविणारे दमदार कार्यशील नेतृत्व म्हणजे अजिंक्य प्रकाश पाटील हे आहेत. ते मागील तीन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करून जन सामान्यांच्या मागण्या शासन दरबारीं रेटून त्या सोडवीण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशिल आहेत.
शांत स्वभावाचे, मृदू भाषिक अजिंक्य पाटील यांनी मारोडा-राजोली जि. प. गटातून निवडणूकिसाठी दावेदारी केली असून या क्षेत्रातील मतदारांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.



