आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
▪️सामाजिक उपक्रमातून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. हंसराजजी अहिर भैया यांचा वाढदिवस साजरा..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : मागासवर्ग आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री मा. श्री. हंसराज_भैय्या अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी तेलगू हायस्कूल, लालपेठ येथे आरोग्य तपासणी शिबीर, नेत्र तपासणी व चष्मे वाटप तसेच शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक, पॅड आणि पेन यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमांना भेट देऊन आयोजकांना शुभेच्छा दिल्या. हंसराज भैय्या अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमांमुळे अनेक नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाल्या तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ झाला. जनसेवा व सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला.



