आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️ राजुरा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शेतकरी संघटनेची वज्रमूठ..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : नगर परिषद राजुरा च्या निवडणुकीसाठी अखेर काॅग्रेस व शेतकरी संघटना यांच्या युतीची रितसर घोषणा दिनांक 11 नोव्हेंबर रोजी राजुरा येथील छत्रपती शिवाजी संकुल येथे झालेल्या सभेत करण्यात आली. यामुळे या बहुप्रतीक्षित युतीला अखेर नेते व कार्यकर्त्यांनी मान्यता देत काँग्रेस आणि शेतकरी संघटनेची वज्रमूठ अधिक घट्ट बनली असून संपुर्ण निवडणूक एकदिलाने लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले तर काॅग्रेस 12 आणि शेतकरी संघटना 9 जागांवर लढणार आहेत. नगर विकास आघाडीचे नगराध्यक्ष उमेदवार काॅग्रेस चे अरूण धोटे राहणार असल्याचे यावेळी घोषित करण्यात आले. यावेळी भरगच्च उपस्थिती असलेल्या सभागृहात जोरदार टाळ्यांच्या गजरात या युतीचे स्वागत करण्यात आले.
या सभेच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप होते. प्रमुख पाहुणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, निळकंठराव कोरांगे, माजी नगराध्यक्ष अरूणभाऊ धोटे, स्वामी येरोलवार, सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष दिनकर कर्नेवार, महिला काॅग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. कुंदा जेनेकर, ॲड.दिपक चटप, सुनिल देशपांडे, सभापती विकास देवाळकर, रंजन लांडे, सुरज ठाकरे, सिध्दार्थ पथाडे, रमेश नळे, दिलीप देठे, हरजितसिंग संधू, निर्मला कुडमेथे, संध्या चांदेकर, नरेंद्र काकडे, दिलीप देरकर, सय्यद सकावत अली, संतोष इंदूरवार, घनश्याम हिंगणे, कोमल फुसाटे आदी काॅग्रेस व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना ॲड. वामनराव चटप म्हणाले की, सन 2001 मध्ये नगर विकास आघाडी निर्माण करून त्यात विरोधी पक्षाला एकाही जागी विजय मिळविता आली नाही. देशात व राज्यात शेतक-यांप्रती व नागरिकांबाबत भाजपची अन्यायकारक भूमिका आणि राजुरा शहरातील लोकांना न्याय मिळावा म्हणून अखेर युतीचा निर्णय घेण्यात आला.
काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी व्होटचोरीचा मुद्दा, देशातील आणि जिल्ह्य़ातील अव्यवस्था, अराजकता, शेतकरी, शेतमजूर, कामगार, निराधार, सर्व सामान्य जनतेवरील अन्याय अधोरेखीत करीत नगर पालिकेच्या निवडणूकीच्या माध्यमातून भाजपला धडा शिकविण्याचे आवाहन केले.
यावेळी निळकंठराव कोरांगे, ॲड. दिपक चटप, सिध्दार्थ पथाडे व अरूण धोटे यांचीही भाषणे झाली.
कार्यक्रमाचे संचालन काँग्रेसचे जिल्हा महासचिव एजाज अहमद यांनी केले.
या सभेत सर्व उमेदवारांचा परिचय करून देण्यात आला. या युतीमुळे दोन्ही पक्षांच्या काही इच्छूकांना उमेदवारी देता आली नसली तरी सर्वांनी मिळून मिसळून कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने काॅग्रेस व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.