आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

▪️लोकाभिमुख विकासासाठी जनतेची भाजपलाच साथ – आमदार देवराव भोंगळे

▪️चिंचोली (खुर्द) येथील काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी धरली भाजपची वाट..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि लोकाभिमुख कार्यामुळे जनतेचा भाजपवरचा विश्वास अधिकच दृढ होत आहे. सर्वांगीण विकास हाच आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू असून आगामी काळातही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपा सरकार सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.

राजुरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात आज (दि.१९) ला चिंचोली (खुर्द) येथील काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन आणि माजी जि.प.सभापती सुनील उरकुडे यांचे नेतृत्वात भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला.

यावेळी आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान.नरेंद्रजी मोदी व राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राजुरा विधानसभा मतदारसंघात विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगार, कृषी विषयक योजना यासह अनेक विकासकामांना गती मिळाली आहे. त्यामुळेच जनता व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भाजपामध्ये येत आहेत, असेही आमदार भोंगळे यांनी सांगितले.

यावेळी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये प्रभाकर उलमाले, केशवा काळे, अमृत डाखरे, विठ्ठल कोल्हे, संदीप टोंगलकर, दिवाकर मोहारे, गोपाल आकनुरवार यांचा समावेश आहे.

यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत केले. या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे राजुरा तालुक्यात भाजपाची ताकद आणखी वाढली असून कार्यकर्त्यांनी भाजपाच्या विकासकामांवर समाधान व्यक्त केले आहे.

याप्रसंगी माजी जि.प.सभापती सुनील उरकुडे, तालुका महामंत्री हरिदास झाडे, सचिन बल्की, प्रफुल कावळे, वैभव पावडे , प्रदीप पाला,दीपक झाडे, कवडू भगत, महादेव हिंगाणे, अर्जुन पायपरे, संतोष झाडे, सरपंच स्वाती मडावी, सचिन बोबडे, महादेव कोल्हटवार, प्रकाश तुंगीलवार, ज्ञानेश्वर उलमाले, बालाजी पारखी, अमोल सोनारे, विलास मडावी, बिजाराम सरवर यांचेसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.