▪️शहर पोलीस स्टेशन ची मोठी कारवाई जबरी चोरी, मोटारसायकल व मोबाईल चोरी…

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : शहरातील विविध जबरी चोरी, मोटारसायकल व मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये चंद्रपूर शहर पोलिसांनी मोठे यश मिळवले असून, दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांसह एक प्रौढ आरोपीला अटक करून एकूण १,९४,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दिनांक ११ जुलै २०२५ रोजी एका फिर्यादीकडून जबरीने मोबाईल हिसकावून नेणाऱ्या घटनेतून या कारवाईची सुरुवात झाली. फिर्यादीचा Vivo कंपनीचा ₹७,०००/- किंमतीचा मोबाईल हिसकावणारा आरोपी शेख राजा अमन कुरेशी (वय २० वर्ष, रा. बगडखिडकी, चंद्रपूर) यास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एम.एच.३४ ए.बी.एस. २४५२ मोपेड (₹५०,०००/-) आणि मोबाईल असा ₹५७,०००/- चा माल जप्त करण्यात आला.
याच दरम्यान, पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या तीन गुन्ह्यांमध्ये बाबुपेठ येथील एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ३ मोटारसायकली (एकूण किंमत ₹१,१०,०००/-) जप्त करण्यात आल्या आहेत.
तर घुटकाळा वार्डातील दुसऱ्या विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून चोरीचे दोन मोबाईल फोन यात एक Vivo (₹१३,५००/-) आणि Redmi 30 (₹१४,०००/-) असे एकूण ₹२७,५००/- किंमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले.
या सर्व कारवाईतून पोलिसांनी जबरी चोरी आणि मोटारसायकल चोरीच्या एकूण पाच गुन्ह्यांमधील आरोपींकडून ₹१,९४,५००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात चंद्रपूर शहर पोलिसांना यश आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके (पो.स्टे. चंद्रपूर शहर) यांच्या नेतृत्वात सपोनि. राजेंद्र सोनवणे, पोउपनि. दत्तात्रय कोलते, विलास निकोडे, तसेच डि.बी. पथकातील म.पो.हवा. भावना रामटेके, पोहवा. सचिन बोरकर, संजय धोटे, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, कपुरचंद खरवार, पो.अं. रूपेश पराते, विक्रम मेश्राम, योगेश पिदुरकर, निलेश ढोक, प्रफुल भैसारे, सारिका गौरकार व दिपीका झिंगरे यांनी केली आहे.



