आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️बीआरटीसीत ‘डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी’ अभ्यासक्रमाची सुरवात..

▪️पहिल्या बॅचचा उद्घाटन सोहळा..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 07 : चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसी) येथे भारतातील पहिल्या एआयसीटीई मान्यताप्राप्त ‘डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी’ या अभिनव अभ्यासक्रमाचा 2026-27 (प्रथम बॅच) उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला.

बांबू क्षेत्रातील तांत्रिक शिक्षण, कौशल्य विकास, संशोधन, नवोपक्रम, उद्योजकता आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. देशातील बांबू उद्योगासाठी कुशल व तांत्रिक मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दिशेने हा ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. सदर अभ्यासक्रमात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसह मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश व नागालँड राज्यातील विद्यार्थी सुद्धा आहेत. एआयसीटीई मान्यताप्राप्त डिप्लोमा अभ्यासक्रमाची एकूण प्रवेश क्षमता 60 आहे.

उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम तर प्रमुख अतिथी म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा बीआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक हृषिकेश रंजन, उपवनसंरक्षक योगेश वाघाये, विभागीय वनअधिकारी राजन तलमले उपस्थित होते.

श्री. रामानुजम यांनी महाराष्ट्र व इतर राज्यातील विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्याबद्दल अभिनंदन करून येथे पुरविण्यात आलेल्या सोईसुविधांच्या लाभ घेऊन आपली प्रगती साध्य करावी, असे आवाहन केले. तसेच इतर मान्यवरांनी बांबू विषयी माहिती देऊन, ब्राझील हा देश इथेनोलचे उत्पादन करून इंधनाच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण झाला, याबद्दल मार्गदर्शन केले. अभ्यासक्रमाची यशस्वी पूर्तता केल्यानंतर विद्यार्थ्यांना नियमानुसार पार्श्व प्रवेश प्रक्रियेद्वारे अभियांत्रिकी पदवी (बी.ई./बी. टेक.) अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध होईल.

बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक एम. एन. खैरनार यांनी प्रस्ताविकातून अभ्यासक्रमाचे महत्व या संबंधी माहिती दिली. आभार वन परिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे यांनी मानले. यावेळी संशोधक, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, विद्यार्थी, बांबू उद्योजक आदी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.