आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️शेती विषयक विवादित महसूली प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन..

▪️लोक अदालतीचा लाभ अवश्य घ्यावा- मृदुला मोरे तहसीलदार मूल..

 

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मुल तालुक्यातील सर्व शेती विषयक विवादीत प्रकरणे या प्रकरणामध्ये आपसी समझोता मध्ये निकाली काढण्याकरिता लोक अदालत बुधवार दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी तहसिल कार्यालय मुल येथे आयोजीत करण्यात आलेली आहे.

तरी मुल तालुक्यतील सर्व नागरीक / शेतकरी / पक्षकार यांची जी महसुली प्रकरणे तहसिलदार, मुल यांचे कडे सुरू आहे व आपण सदर प्रकरणे आपसी समझोत्यानी निकाली काढावयाची असल्यास निकाली काढण्याकरिता आपल्याला आवाहन करण्यात येत आहे.

करिता सदर लोक अदालत मध्ये सर्व नागरीक / शेतकरी / पक्षकार जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. तरी लोक अदालतीचा लाभ सर्व सामान्य नागरीक यांनी घ्यावा .असे मृदुला मोरे तहसिलदार,मुल यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.