आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
▪️सिरोंचा तालुक्यात वाढले अपघात..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे तसेच ओव्हरलोड वाहतुकिमुळे सिरोंचा तालुक्यात अपघात वाढले आहेत. जगदलपुर निलगिरीचे खांब घेऊन जाणाच्या ट्रकचा सिरोंचा मुख्यालयपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर मंगळवारच्या पहाटे भीषण अपघात झाला आरडा टर्निंगजवळ ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला प्रवासादरमियन ट्रक चालक झोपेत असल्याने वाहने रस्त्यांवरील तीव्र वळणावर नियंत्रणाबाहेर गेले नसरुद्दीन अन्सारी ( रा. जगदलपुर) असे ट्रक चालकाचे तर रामसिंग ( रा. जगदलपुर ) असे मालकाचे नाव आहे रस्त्यांच्या कडेला ट्रक उलटल्याने काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता सुदैवाने या अपघातात कोणतिही जीवितहानी झाली नाही तालुक्यातिल वाढत्या अपघातामुळे चिंता व्यक्त होत आहे.



