▪️चिचाळ्यात अस्वलीचा रात्रभर धुमाकूळ एक गंभीर जखमी..
▪️रेस्क्यू ऑपरेशन राबवून केले जेरबंद..
डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : प्रादेशिक वनपरिक्षेत्र चिचपल्ली अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील चिचाळा येथे मंगळवारच्या रात्री तीन अस्वलींनी गावात भटकंती केली. त्यातील एका अस्वलीने रात्रभर धुमाकूळ माजविला. त्यात चिचाळा येथील एका घरातील सुरेश काशिनाथ कुनघाडकर हे गंभीर जखमी झाले.त्यांना मूलमध्ये प्राथमिक उपचार करून नागपूर येथे पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. या घटनेने चिचाळा येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी सकाळी वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून धुमाकूळ माजविणाऱ्या अस्वलीला जेरबंद करण्यात यश मिळवले. तिला जंगलात सोडण्यात आले.मंगळवार (ता. १६) रात्री बारा वाजताच्या दरम्यान चिचाळावासींनी अस्वलींचा थरार आपल्या डोळयांनी बघितला. चिचाळा गाव जंगलाच्या शेजारी असून कवडपेठ मार्गाने तीन अस्वली गावात पोहोचल्या. त्यातील दोन अस्वली परत जंगलात निघून गेल्या. त्यातील एक भटकल्याने रात्रभर गावात धुमाकूळ घालत होती. कुत्रे मागे लागल्याने तसेच नागरिकांच्या ओरडण्याने पिसाळलेल्या एका अस्वलीने जिथे मार्ग मिळेल तिथे आपले बस्थान मांडण्याचा प्रयत्न केला. एका घरा शेजारी आल्यानंतर घराच्या बाहेर निघालेल्या सुरेश काशीनाथ कुनघाडकर यांच्यावर हल्ला गंभीर जखमी केले. त्याच्या डोळयाजवळ गंभीर इजा झाल्याने त्यांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे रेफर केले. परंतु गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढीलउपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे. त्याच्या कुटुंबीयांनातातडीची दहा हजारांची आर्थिक मदत वनविभागाने केली आहे.एका अस्वलीच्या देखरेखीसाठी वनविभागाची चमू येथे तैनात करण्यात आली. बुधवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन राबवून अस्वलीस जेरबंद करण्यात यश मिळाले. तिला जंगलात सोडण्यात आल्याचे एका व कर्मचाऱ्याने सांगितले. अस्वलीच्या थरारामुळे चिचाळा येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेतुन्हा एकदा मानव वन्यजीव संघर्षनिर्माण झाला आहे.

