आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️स्वच्छता दूत गौरव शामकुळे यांचे अकाली निधन..

▪️मूल तालुका झाला स्वच्छता दूतापासून पोरका..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल शहराचे स्वच्छता दूत म्हणून स्वतः शहर स्वच्छतेची जबाबदारी घेणारे स्वच्छता मित्र गौरव शामकुळे यांचे अल्पशा आजाराने अकाली निधन झाले. ते ३७ वर्षाचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चांगली नव्हती. आज ता.१९ आक्टोबर २०२५ ला पहाटेच्या सुमारास त्यांना अधिकच त्रास होऊ लागल्याने प्रथम मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. नेहमी प्रमाणे मूलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णाला रेफर टू चंद्रपूर ची चिठ्ठी दिली. नातेवाईकांनी गौरवला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र इथेही उपचार होणार नसल्याचे कारण सांगून रेफर टू नागपूर सांगण्यात आले. त्यांना नागपूरला नेत असतानाच मार्गातच गौरवची प्राणज्योत मालवली. नातेवाईकांनी वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून खातरजमा करून घेतली. ३७ वर्षीय गौरवने आपल्या निस्वार्थी स्वच्छतेच्या कार्यातून केवळ मूल शहरातच नाही तर संपूर्ण तालुक्यात स्वच्छता दूत म्हणून एक चांगली ओळख निर्माण केली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्याचे माजी वित्तमंत्री तथा बल्लारपूर विधानसभेचे विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना स्वच्छता दूत म्हणून सन्मानित करून स्वच्छता कार्यासाठी सायकल भेट दिली. गौरव यांनी स्मशानभूमी परिसर, सोमनाथ मंदिर आणि परिसर, शहरातील अनेक भागातील अस्वच्छता स्वच्छतेमध्ये बदलविली. सुरवातीला एकट्याने सुरू केलेल्या या चांगल्या कार्यामुळे व त्यांच्या सकारात्मक विचारांमुळे अनेक कार्यकर्ते त्यांच्याशी जुळले आणि एक स्वच्छता मित्रांची टीम तयार झाली. युट्युब चॅनेलच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील सामाजिक घडामोडी लोकांपर्यंत पोहचविणारा आणि विविध क्षेत्रात कार्य करणारा “गौरव” अशी त्यांची ओळख होती.आज ता. १९ आक्टोबर २०२५ला त्यांच्या निधनाची बातमी समाज माध्यमावर दिसू लागताच अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांच्या अकाली जाण्याने शहरवासीयांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.मूल शहराने समाजाभिमुख, हसतमुख, दिलखुलास व्यक्तिमत्वाचा धनी गमावला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.