आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️रत्नापूर येथील कपिल करतोय रक्तदानाच्या माध्यमातून रुग्णांची सेवा..

▪️३५ वेळा केले रक्तदान इतरांसाठी प्रेरणादायी..

श्री अमोल निनावे

सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
मो. नं. 9764271316

नवरगांव समाजामध्ये जगत असतांना काही स्वार्थी तर काही दानशुर व्यक्तीही आढळतात. कुणी पैसा, चल अचल संपत्ती वाटुन दानशुर असल्याचा दाखला देतात. मात्र एका तरुणाने आपणही समाजाचे देणे लागतो हा विचार समोर ठेवून चक्क ३५ वेळा रक्तदान करून खरे दानशुर असल्याचा परिचय करून दिला.
विज्ञानाने संपूर्ण जगात विविध संशोधन करुन मानव जिवनासह इतरही विभागात अफाट प्रगती साधली असली तरी मनुष्य प्राण्याला जगण्यासाठी लागणाऱ्या रक्ताची निर्मीती करण्या पर्यंत अजुनही पोहचले नाही. मानवी रक्ताची निर्मीती करण्यासाठी मानवाचे शरीरच पाहिजे. अनेकांना वैद्यकीय उपचारा दरम्यान, आॕपरेशनच्या वेळेला रक्ताताची अंत्यत गरज भासते. ते वेळेवर मिळाले नाही तर रक्ता अभावी अनेकांना आपला जीव गमावण्याची वेळ येते.
अशा घटना वारंवार वृत्तपञाच्या माध्यमातून वाचतांना सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले, सुशिक्षित तरुण कपिल सदाशिव मेश्राम यांना श्री गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ रत्नापूर यांच्या माध्यमातून प्रेरणा मिळाली आणि या मंडळाच्या नेहमी होत असलेल्या रक्तदान शिबीरातुन, किंवा एखाद्या रुग्ण दवाखान्यात भर्ती असुन त्याला रक्ताची गरज असल्यास स्वता दवाखान्यात जाऊन रक्तदान करून रुग्णाचे प्राणही वाचवीले असुन आतापर्यंत त्यांनी ३५ वेळा रक्तदान करुन अनेकांचे जिव वाचविल्याने तो तरुण इतरांसाठी आदर्श व प्रेरणादायी ठरलेला आहे.
कपिल मेश्राम यांचा रक्तगट ओ पाॅजीटीव्ह असुन कोणत्याही रुगणांसाठी खऱ्या अर्थाने तो रक्ताच्या बाबतीत तो दानशुर ठरला आहे. मागील सतरा वर्षापासून सर्वात श्रेष्ठ दान म्हणजेच रक्तदान होय आणि तेच काम तो कुठल्याही मोबदल्यावीना करीत असल्याने रक्तदाता कपिल चे तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा माजी जि. प. सदस्य रमाकांत लोधे, माजी सरपंच सदाशिवराव मेश्राम, माजी तंमुस अध्यक्ष संजय गहाने. ग्रा. पं. सदस्य मंगेश मेश्राम, वासुदेव दडमल, प्रविण कामडी, इमरान पठान, पोलिस पाटील नरेंद्र गहाणे, रूपेश मेश्राम, दिलीप मेश्राम,सुनिल डेकाटे,अजय मेश्राम, आदींनी त्याच्या कार्याबद्दल अभिनंदन केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.