ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ‘वंदे मातरम्’ गीताचा अवमान केल्याच्या निषेधार्थ गडचिरोलीत भाजपचा तीव्र निषेध..

▪️माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग..

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : दि. १७ ऑगस्ट २०२६ स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ‘वंदे मातरम्’ गीताचे गायन मध्येच थांबविल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा अवमान झाल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली. “सोनिया गांधी मुर्दाबाद, वंदे मातरम् विजय असो” अशा घोषणांनी इंदिरा गांधी चौक परिसर दुमदुमून गेला.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्याशी आणि राष्ट्रभावनेशी भावनिकदृष्ट्या जोडलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा सन्मान राखला गेला पाहिजे, अशी भावना माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी व्यक्त केली. राष्ट्राच्या अस्मितेशी आणि स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाशी जोडलेल्या राष्ट्रीय गीताचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या निषेध आंदोलनात डॉ. अशोकजी नेते यांनी सहभागी होत या घटनेचा जाहीर निषेध केला. राष्ट्रभावनेशी निगडित असलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताबद्दल आदराची भावना कायम राहिली पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या आंदोलनाला आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागाडे, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, उपनगराध्यक्ष निखिल चरडे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, प्रकाश गेडाम, ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे, शहराध्यक्ष तथा न.प. सभापती अनिल कुनघाडकर, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका योगिता पिपरे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष विलास भांडेकर,रोशनी वरघंटे, अनिल पोहनकर, आनंद भांडेकर, गोवर्धन चव्हाण, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, नरेश हजारे,साई सिलमवार यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा सन्मान आणि राष्ट्रभावनेचा आदर अबाधित राखण्याचा निर्धार व्यक्त केला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.