▪️तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाची बाजी..

*🔸श्री खुशाल डोंगरवार*
*🔸लाखांदूर तालुका प्रतिनिधी*
*🔸मो. नं. 7588789975*
लाखांदूर – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक १५ व १६ सप्टेंबर २०२५ ला क्रीडा संकुल लाखांदूर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय लाखांदूर ने बाजी मारली.
कब्बडी १७ वर्षे मुली व १९ वर्षे मुली या दोन्ही वयोगटात विद्यालयातील मुलींच्या चमूने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या दोन्ही चमू जिल्हास्तरावर लाखांदूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यशस्वी विद्यार्थिनींनी आपल्या यशाचे श्रेय विद्यालयाचे मुख्याध्यापक,चमू शिक्षक तसेच शाळेत कार्यरत सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांना दिले आहे.
दोन्ही विजयी चमूंचे विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रधान सर तसेच चमू शिक्षक चौधरी सर,अनिस पठाण,वाळवे सर,पारधी सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

