▪️सेवाभावातून विश्वास, विश्वासातून जनसेवा..माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार
▪️नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, मागण्या आणि सुचना मनापासून ऐकून.. माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या चंद्रपूर येथील कार्यालयात नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, मागण्या आणि सुचना मनापासून ऐकून घेतल्या. शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करून त्यांनी प्रत्येक नागरिकाच्या भावनांना समजून घेत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. जनतेच्या आवाजाला प्रत्यक्ष प्रतिसाद देणारा हा संवाद नागरिकांसाठी विश्वास आणि दिलासा देणारा ठरला.
आ. मुनगंटीवार यांच्यासाठी लोकांचे प्रश्न हे केवळ निवेदन नसून जनसेवेतील प्रेरणास्थान आहेत. “जनतेचे दु:ख माझे आहे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणे हेच माझे ध्येय आहे,” या भावनेतून ते प्रत्येक प्रश्नावर संवेदनशीलतेने प्रतिसाद देतात. जनतेशी असलेली आत्मीय नाळ आणि सेवाभावाने कार्य करणारी त्यांची कार्यशैली हेच त्यांच्या लोकप्रियतेचे खरे अधिष्ठान आहे.



