ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मूल नगर परिषदेच्या विषय समितीच्या सभापती पदासाठी बिनविरोध निवड..

▪️राकेश रत्नावार, प्रशांत समर्थ, विलास कागदेलवार, ललिता फुलझेले आणि नलिनी आडपवार झाले विषय समितीचे सभापती तर समीक्षा कडस्कर उपसभापती..

 

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : काॅंग्रेसच्या वर्चस्वातील वीस सदस्यीय मूल नगर परिषदेच्या विषय समितीच्या सभापती निवडी संबंधीची विशेष सभा नुकतीच पार पडली.

विस पैकी अठरा जागांवर काॅंग्रेसने विजय संपादन केल्याने संख्याबळाच्या प्रमाणांत नगर परिषदेच्या पाच विषय समितीच्या सभापती पदावर काॅंग्रेसचे वर्चस्व राहणार हे निर्विवाद सत्य होते.

पिठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी संदीप दोडे यांचे उपस्थितीत आज पार पडलेल्या सभेला नगराध्यक्ष एकता प्रशांत समर्थ यांचेसह नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. झालेल्या सभेत नगर परिषदेचे उपाध्यक्ष तथा गटनेते राकेश रत्नावार यांची आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापती तर प्रशांत समर्थ यांची बांधकाम समितीच्या सभापती पदी वर्णी लागली. ललिता सुरेश फुलझेले यांची शिक्षण समितीच्या तर विलास कागदेलवार यांची पाणी पुरवठा समितीच्या सभापती पदावर निवड झाली. नलीनी आडपवार यांना महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. समीक्षा कडस्कर महिला बालकल्याण समिती उपसभापती राहणार आहेत.
निवडण्यांत आलेल्या पाचही समितीच्या सभापती पदांची निवड प्रक्रिया शांततेत पार पडली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.