▪️शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चे रा. से. यो. विशेष शिबीर पिंपळखुट ग्रामी संपन्न..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : स्थानिक शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालया चे राष्ट्रीय सेवा योजना द्वारा आयोजित विशेष शिबीर चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपळखुट या गावी दि. 17 जानेवारी ते 23 जानेवारी 2026 या कालवधित यशस्वी रित्या संपन्न झाला..ग्रामस्वच्छता, ग्रामनीत्ती युवा जागृती व कायदे विषयक जनजागृती या संकल्पने वर आधारित या शिबिराचे रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी नंदकिशोर भंडारी, सहाय्यक रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉक्टर लीना लंगडे आणि माजी रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सरोज कुमार दत्ता यांच्या मार्गदर्शन आणि देखरेखी खाली गेल्या 25 वर्षा पासून चंद्रपूर ज़िल्ह्यातील विविध गावी असे शिबीर विधी महाविद्यालय दर वर्षी यशस्वी रित्या आयोजित करून गावों गावी कायदे विषयक जनजागृती आणि आरोग्य विषयक मोफत मार्गदर्शन आणि औषधी वितरण कार्यक्रम गावातील लोकांनसाठी राबविण्यात आले.
या सात दिवसीय शिबारा दरम्यान चंद्रपूरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. मोनिका कोतपल्लीवार, डॉक्टर वंदना रेगुंडवार, डॉक्टर रुजिता मुंधडा, डॉक्टर शुभांगी वासाडे डॉक्टर स्नेहल पोटदुखे चर्मरोग तज्ञ , गावातील 62 महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन व तपासणी करून योग्य उपचार प्रदान केले. प्रसिद्ध चर्मरोग तज्ञ स्नेहल पोटदुखे यांनी गावातील लोकांच्या त्वचे संदर्भातील समस्या जाणून जवळ पास 35 गावकरयांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांची तपसणी करून उपचार करण्यात आले.सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय तर्फे मोफत मोतीबिंदू व 150 गावकरी यांची सामान्य आरोग्य तपासणी करण्यात आली आणि 50 लोकांना तपासणी करून औषध देण्यात आले. 33 गावाकऱ्यांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिये साठी पाठवण्यात आले.या शिबिराचा महत्वपूर्ण उपक्रम म्हणजे कायदेविषयक मोफत मार्गदर्शन, या अंतर्गत कायदे विषयक मार्गदर्शन प्रमुख डॉ. अभय बुटले, सहाय्यक कायदेविषयक अधिकारी प्रा.पवन गुजर, ऍड. विलास जांगडे. ऍड. प्रीतम नागपुरे, ऍड फरहात बेग, ऍड. कल्याणकुमार या सर्वांनी विविध कायद्याचे मार्गदर्शन केले असून गावाकरांच्या प्रश्नांना ची सोडवणूक केली .रा से यो. विध्यार्थी स्वयं सेवकांनी या शिबिरात गावातील कायदेविषयक खटले या विषयी सर्वेक्षण केले व योग्य समस्या निवारण केले. चंद्रपूरातील योग नृत्य परिवार, संजय पडशीलवार आणि त्यांची टीम द्वारा झुंबा नृत्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थी द्वारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले व विविध क्रीडा स्पर्धा देखील घेण्यात आल्या.शिबीरचे आयोजन पिंपळखुट गाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत करण्यात आले होते.., पिंपळखुट गावच्या सरपंच श्री.विनोद मेश्राम , उप सरपंच श्री. प्रदीप तोडसे, सौ.वनिता रांगनकर मुख्याध्यापक, श्री.प्रमोद गेडाम उपमुख्याध्यापक, श्री संतोष मेश्राम शाळा सभापती, श्री. प्रकाश पवार ग्रामसेवक , रसिकाताई खाते तंटा मुक्ती यांनी शिबिराच्या संपूर्ण कार्यक्रमात सक्रिय सहभाग दिले. शिबिराचा समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संजय कुमार सिंग, प्राचार्य डॉ. ऐजाज शेख तसेच संस्थेतील सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजना साठी हार्दिक अभिनंदन केले. व आजच्या तरुण पिढीने या शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागाशी जुळण्याचे आव्हान देखील केले. प्रत्येक नागरिकांनी आपल्या देशा प्रति समाजा प्रति आपल्या दायित्वाची जाणीव या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून जागृत ठेवण्याचे शिबीर आयोजना मागची भूमिका प्राचार्य डॉ ऐजाज शेख यांनी व्यक्त केली . शिबिराला विधी महाविद्यालय येथील 80 विद्यार्थी सहभाग झाले.शिबिराच्या यशस्वी आयोजना साठी संस्थेचे समस्त पदाधिकारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.महाविद्यालया तिल सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिबिरात सहभाग दिला.


