ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️जागृत ग्राहक राजा सामाजिक, ग्राहक संघटने तर्फे प्रवासी दिन उत्साहात साजरा..

 

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : जागृत ग्राहक राजा या सामाजिक/ग्राहक संघटनेच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या प्रवासी बंधू भगिनींना योग्य ठिकाणी योग्य सेवा देत सुरक्षित पोहोचविण्याचे आवाहन करीत वेगवेगळ्या प्रवासी स्थळांवर चालक, वाहक व वाहतूक नियंत्रकांचा सत्कार करण्यात आला.

यानिमित्ताने प्रवासी बंधू भगिनींना प्रवासी ग्राहक म्हणून त्यांचे हक्क व अधिकार आणि फसवणूक व शोषणाचे प्रकार याविषयी माहिती देण्यात आली.

शासकीय यंत्रणेने पुरवलेली सेवा असो की खाजगी यंत्रणांनी पुरवलेली सेवा असो यांमध्ये ग्राहक म्हणून कुणावर अन्याय होऊ नये तसेच काही समस्या उद्भवल्यास संवाद आणि समन्वयातून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत यांनी आपल्या संबोधनातून केले.

याप्रसंगी रेल्वे स्थानकावर पपेश मेश्राम, स्टेशन अधिक्षक, कृष्णा कुमार, साजन भडके, धम्मदिप लाकडे, निकिता चिमुरकार, जतिंद्र बारसागडे, अखिलेश कुलदरे, लोको पायलट, चालक पायलट, गार्ड, मालगाडीचे चालक, तसेच जावेद शेख, अतिक शेख, आणि इतर प्रवासी बंधू भगिनी उपस्थित होते.

तर खाजगी बस स्थानकावर, बसचालक, वाहक, संचालक, नंदूभाऊ, विजय चिलके, व अन्य प्रवासी बंधू भगिनी उपस्थित होते.

मूल शहरातील रेल्वे स्थानक, बसस्थानक व खाजगी वाहतूक थांब्यावर रेल्वेचे चालक व गार्ड, यांचे स्वागत करताना रेल्वेचे वेळापत्रकानुसार चालावी यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच बस स्थानकावर बसेसचे चालक व वाहक, खाजगी बस स्थानकावर बसेसचे चालक व वाहक व संचालक तसेच प्रवासी ग्राहकांचे पुष्पगुच्छ व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले आणि प्रवासी हे आपले भाऊबंद असल्याने त्यांच्या जिविताचीही जबाबदारी आपल्यावर असल्याने (गाडी) बस चालवताना काळजीपूर्वक चालविण्याचे आवाहनही करण्यात आले, याशिवाय कुठेही अकारण प्रवासी ग्राहकांशी वादविवाद होणार नाही आणि खाजगी असो वा शासकीय वाहतुक करणाऱ्यांविरोधात आम्हाला प्रश्न उपस्थित करण्याची गरज पडू नये यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले, बऱ्याच ठिकाणी बसथांब्यावर आवश्यक सोयीसुविधांचा अभाव असल्याने प्रवासी व महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे या सोयीसुविधा उपलब्ध असतील याची काळजी घेतली जाण्याची आवश्यकता विशद करण्यात आली.

या प्रवासी दिन समारंभात, दीपक देशपांडे, अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत, रमेश डांगरे सचिव मूल तालुका शाखा मूल, डॉ आनंदराव कुळे कार्यकारिणी सदस्य, प्रमोद मशाखेत्री, रजनी झाडे, मायाताई कडवलवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.