▪️नव्या दमाचे युवा नेतृत्व महेश चौधरी मूल नगरपालिका निवडणूक रिंगणात..
▪️प्रभाग क्रमांक ०१मधून शिवसेना (उ. बा. ठा.) चे उमेदवार

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत प्रभाग ०१मधून सर्व साधारण प्रवर्गातून शिवसेना (उ. बा. ठा.) पक्षाकडून आपले सर्वांचे परिचित, सर्वांसाठी नेहमी उपलब्ध असणारे शिवसेना (उ. बा. ठा.)चे एकनिष्ठ पाईक श्री. महेश चौधरी आपला उमेदवारी अर्ज आपणा सर्वांच्या साक्षीने, आपल्या सर्वांच्या सेवेसाठी दाखल करणार आहेत.
शांत, प्रेमळ स्वभाव, माणसे जोडण्याची सवय,समाजाची सेवा करण्याची तळमळ यामुळे त्यांचे नेतृत्व उभारी घेत आहे. त्यांनी सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला असून मूल शहरातील आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि बेरोजगारी इ.समस्यांच्या बाबतीत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून, वेळोवेळी पाठपुरावा करून,वेगवेगळे उपक्रम राबवून समस्या सोडवीण्याचा प्रयत्न केला.तळागाळातील लोकांच्या समस्या सोडविणारा आपला माणूस अशी ओळख असलेल्या महेश चौधरी यांनी समाजकार्यात सातत्य ठेऊन गरजूपर्यंत मदत पोहचवली आहे.
त्यांनी प्रभाग ०१ मध्ये जनसंपर्क वाढविला असून प्रभागातील जनतेच्या गाठीभेटी घेऊन समस्या जाणून घेत आहेत. सोबतच त्या सोडवीण्याच्या प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या जनसंपर्कामुळे प्रभागातील जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. सध्यातरी त्यांची जमेची बाजू असून त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह आहे.


