आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️माजी विद्यार्थी मेळावा महाविद्यालयाशी आत्मीयता जोडणारे व्यासपीठ : युवा व्याख्याते तुषार दुधबावरे

 

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : माजी विद्यार्थी मेळावा हे माजी विद्यार्थ्यांना वर्तमानात देखील आपापल्या महाविद्यालयाशी जोडणारे आणि आपापल्या गुरुजनांशी आणि मित्रमंडळींशी महाविद्यालय स्तरावर हितगुज करण्याचे अभिजात व्यासपीठ आहे असे प्रतिपादन प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले युवा व्याख्याते तुषार दुधबावरे यांनी केले. स्थानिक शिवाजी कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,गडचिरोली आयोजित ‘सप्तरंग 2026’ क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात माजी विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष मान गोविंदरावजी बानबले सहसचिव शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ,गडचिरोली यांनी वर्तमानातील विद्यार्थी हा वैचारिक प्रबोधनापेक्षा मनोरंजनाच्या तथा करमणुकीच्या इतर साधनांकडे अधिक आकर्षित होणे ही वर्तमान पिढीच्या भविष्यासाठी अतिशय चिंताजनक बाब आहे अशी खदखद व्यक्त केली.प्र अतिथी प्रणय उराडे यांनी छ. शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकून छ.शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांचा जीवन सुखकर बनण्यात शिक्षकांचा अमूल्य योगदान असे विचार वि.अतिथी रमेश चौधरी नगर परिषद,गडचिरोली सदस्य यांनी व्यक्त केले.शिवाजी महाविद्यालयातुन 12 वी तसेच कला,विज्ञान व वाणिज्य शाखेतून पदवी पदव्युत्तर शिक्षण घेऊन आपापल्या वयक्तिक आयुष्यात व्यस्त असणारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी यांचा आजही महाविद्यालयाशी ऋणानुबंध कायम राहावा व महाविद्यालयायाच्या हितासाठी माजी विद्यार्थ्यांना एका मंचावर येऊन आपलं योगदान देता यावा या अभिजात हेतूने प्राचार्य डॉ नंदाजी सातपुते सर यांच्या संकल्पनेतुन माजी विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळेस मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य मान.डॉ.नंदाजी सातपुते,प्रा.डॉ. खुणे,प्रा राजेश कात्रटवार,प्रा. मलोदे,स्वामी कर विभाग,कल्याणी गेडाम खोब्रागडे माजी सरपंच प्रा.डॉ.कोल्हे, प्रा. डॉ.मेश्राम, प्रा. डॉ.उईके इत्यादी प्राध्यापकवृंद उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा.वैभव म्हस्के यांनी केले.तर आभार प्रा. वैष्णवी बी.भुरले यांनी मानले .
यावेळेस सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व शेकडो विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.