ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मुलचेरा तालुक्यातील अनुसूचित जमाती शेतकन्यांसाठी कृषी प्रशिक्षण व निविष्ठा वितरण..

 

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधि उज्वल देवनाथ

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : मुलचेरा – भा, कृ, आनु ,प:- केंद्रीय कापुस संशोधक संस्था नागपुर द्वारा जिल्ह्यातील अनुसूचित जमाती शेतकन्यांसाठी शेतकरी प्रशिक्षण व कृषी निविष्ठा वितरण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली या गावात आयोजीत करण्यात आले होते
हा कार्यक्रम केंद्र शासन पुरस्कृत अनुसुचित जमाती विकास कृती आराखडा भारतीय कृषी संशोधनपरिषदेचे संचालक डॉ, व्ही, एन, वाघमारे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ दीपक टी नगराळे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला
यावेळी फवारणी संरक्षण किट लपेटा पाईप,जैविक खते व पाण्यात विरघळणारे नक्षत्र : पालाश (१९:१९:१९) खते ईत्यादी निविष्ठा उपस्थित अनुसूचित जमाती समूहातील शेतकन्यांना वितरित करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे वरीष्ठ तांत्रीक सहाय्यक आर,एम,रामटेके ग्राम अधिकारी,एस,एम,मराठे आकाश लवटे सरपंच गणेश हलामी सारंग श्रीरामे तसेच गावातील प्रगतशील शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते सुरुवातीला आर,एम,रामटेके यांनी कपासीतील तण नियंत्रण धान,कापुस हरभरा या पिकांरीर कीड व खत व्यस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले, एस, एम, मराठे यांनी गावातील विविध योजनाबद्धल माहिती दिली तसेच आकाश लवटे यांनी कृषी वभागातील योजना गटाबद्धद माहिती दिली व सारंग श्रीमामे यांनी संचालन करून आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात संदीप मात्ठामे यांचे सहकार्य लाभले बोलेपल्ली ( मुलचेरा) या गावातील एकूण ६० आदिवासीं शेतकन्यांना या कार्यक्रमाचा लाभ झाला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.