▪️गुटखाबंदीसाठी कायदा करणार आता थेट मकोका लावणार..
▪️सरकारचे आक्रमक पाऊल महाराष्ट्रत आता गुजरातच्या धर्तीवर स्वतंत्र कायदा..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : राज्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखूवर बंदी असूनही चोरट्या मार्गाने होणारी विक्री रोखण्यासाठी आता राज्य सरकारने आक्रमक पाऊल उचलले आहे गुजरातच्या कठोर दारूबंदी कायध्याच्या नर्तीवर महाराष्ट्रात गुटखाबंदीसाठी स्वतंत्र आणि कडक कायदा करण्यात येणार आहे
विशेष म्हणजे या व्यवसायातील संघटित टोळ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी आता वेट मकोकां कायध्यांतर्गत करवाई करण्याचा प्रस्ताव असून आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे
गुटखा विक्री हा केवळ वैयक्तिक गुन्हा नसून ते एक संघटित गुन्हेगारी स्वरूप थारण करत आहे त्यामुळे वारंवार गुन्हा करणान्या गुटखा माफियांवर आता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मकोका लावला जाणार आहे
महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाईची मोहीमही राबविली जाते मात्र तरीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने विक्री सुरूच आहे
शाळा आणि महाविद्यालयीन तरुण गुटख्याच्या आहारी जात असल्याने सरकारने शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे
पोलीसांनी या परिसरात नियमित गस्त घालून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत
जिल्हा पोलिसांनी गेल्या वर्षभरात अनेक धाडसी करवाया केल्या आहेत पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे लाखांचा मु्द्देमाल जप्त केला होता जिल्ह्यात वर्षभरात गुटख्यासह लाखों रुपयांचा मु्द्देमाल जप्त करण्यात आला आहे
जिल्ह्यात प्रमुख्याने मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ़ सीमाभागातून गुटखा येत असल्याचे बोलले जाते इतरही राज्यातुन छुप्या मार्गने हा गुटखा येत आहे
गुजरातमध्ये ज्याप्रमाणे दारूबंदीसाठी स्वतंत्र आणी कडक तरतुदी आहेत तसाच कायदा महाराष्ट्रात गुटख्यासाठी केला जाणार आहे गुटखा विक्री हा गंभीर फौजदारी गुन्हा ठरेल
मकोकां लागल्यास गुन्हेगारांना किम ५ वर्षापासून ते जन्मठेपेपर्यतच्या शिक्षेची तरतुद आहे किमान ५ लाख रुपयांचा दंड तसेच गुन्हेगाराने या व्यवसायातून कमावलेली मालमत्ता सरकार जमा केली जाऊ शकते अशी माहिती प्राप्त झाली आहे.



