▪️आधार दिव्यांग संघटनेची कार्यकारणी गठीत..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : श. प्र. आज दिनांक 17/11/2025 ला चामोर्शी येथील साधुबाबा कुट्टी मंदिर मूल रोड चामोर्शी येथे दिव्यांग बांधवाची बैठक घेण्यात आले सदर बैठकी मध्ये दिव्यांगाचे हक अधिकार, संघटन बांधणी, संघटनेचे महत्व, या विषयाला घेऊन चर्चा करण्यात आली त्यातूनच संघटन अती महत्वाची असल्याने संघटनेचे स्थापना करण्यात आली संघटनेला आधार दिव्यांग संघटना चामोर्शी असे नाव देण्यात आले व कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आले
दर महिन्याच्या सात तारखेला मासिक बैठक घेण्याचे आयोजन झाले कारण दिव्यांग हक अधिकार अधिनियम कायदा 2016 या कायद्यानुसार दिव्यांगाला मिळणाऱ्या शासकीय योजना व इतर सुविधा याची अंमलबजावणी करण्यासाठी संघटनेमार्फत करणे योग्य असल्याने चामोर्शी येथील दिव्यांग बांधवांनी संघटनेला जोडून आपली संघटन शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे
तरी खालील कार्यकारी मंडळाचे पद सिद्ध लोकांसोबत संपर्क साधून संघटनेला जोडून घ्यावे
आधार दिव्यांग संघटना चामोर्शी
चंदन रामकृष्ण खरवडे अध्यक्ष
कौसल्या गजानन बुरांडे उपाध्यक्षभास्कर किसन बटे सचिव राहुल नामदेव उंदिरवाडे सहसचिव मारोती मधुकर दासरवार कोषाध्यक्षअनिल लक्ष्मण जेटीवार संजय तुकडोजी चावरे मनोज बळवंत बंडावार अनिल अंबादास सातपुते सदस्य



