◼️ बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

धनराज सरपाते – सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही (इंडिया २४ न्यूज): दि. १८/०२/२०२६
जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना जिल्हा शाखा चंद्रपूर यांच्या वतीने लिपिक संवर्गातील प्रलंबित मागण्याकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ तिव्र असहकार व बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्य अध्यक्ष अशोक विठ्ठल डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेने चौथा वेतन आयोगापासूनची वेतनत्रुटी दूर करून सुधारित वेतनश्रेणी लागू करणे, पदनाम बदल व पदोन्नती साखळी कमी करणे, सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अनुकंपा प्रतीक्षायादीतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देणे या प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. याशिवाय जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मृदू व जलसंधारण विभागात समावेश न करण्याची मागणीही करण्यात आली आहे. १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी निदर्शने करून २३ फेब्रुवारी पासून बेमुदत काम बंद आंदोलन छेळण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.



