▪️वरोरा येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन; लघु-मध्यम वृत्तपत्रांच्या प्रश्नांवर होणार निर्णायक चर्चा..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल (इंडिया २४ न्यूज ) :- लघु व मध्यम वृत्तपत्रांच्या अस्तित्व, हक्क आणि बदलत्या माध्यमविश्वातील आव्हानांवर सखोल विचारमंथन करण्यासाठी स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर असोसिएशन यांच्या वतीने राज्यस्तरीय पत्रकारांचे एकदिवसीय खुले अधिवेशन शनिवार, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी वरोरा येथे आयोजित करण्यात आले आहे.
हे अधिवेशन सकाळी ११.०० वाजता नगर भवन, हनुमान वॉर्ड, वरोरा येथे सुरू होऊन दुपारी ३.०० वाजेपर्यंत चालणार असून राज्यभरातील पत्रकार, संपादक, प्रकाशक, मुद्रक, वार्ताहर तसेच डिजिटल माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
अधिवेशनाचे उद्घाटन बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून खासदार प्रतिभाताई धानोरकर उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून वणीचे आमदार संजय देरकर व राजुराचे आमदार देवराव भोंगळे कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
याशिवाय जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर (चंद्रपूर), मंगेश वरकड (वर्धा), तसेच राजेश्वर कल्याणकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष उत्तम वाडकर राहतील. शिवसेना (शिंदे गट) लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे व वरोरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष अर्चना ठाकरे देखील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
*चर्चेचे प्रमुख विषय*
या अधिवेशनात खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन होणार आहे –
* लघु व मध्यम वृत्तपत्रांसमोरील आर्थिक अडचणी
* जाहिरात धोरणातील बदल व शासकीय मान्यता प्रक्रिया
* डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेत झालेले परिवर्तन
* पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी
* नव्या तंत्रज्ञानाचा वापर व भविष्यातील संधी
* मुक्त चर्चासत्र व अनुभव मांडणी
सहभागी पत्रकार व संपादकांना आपले अनुभव, मते आणि सूचना मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
राज्यभरातील पत्रकारांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी अधिवेशनात विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
*राज्यस्तरीय युवा पत्रकार पुरस्कार*
अश्विनी पुरी – प्रदेशाध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विंग
*जीवनगौरव पुरस्कार*
डॉ. विश्वास आरोटे – संपादक, दैनिक समर्थ गावकरी; राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (अकोले)
पंढरीनाथ बोकारे – ज्येष्ठ पत्रकार, नांदेड
राजू पाटील – संपादक, दैनिक मनोगत व द रिंगण लाईव्ह (औसा, लातूर)
किशोर पाटील – संपादक, दैनिक स्वराज्य तोरण (भिवंडी)
रमाकांत साळुंके – संपादक, साप्ताहिक सिद्धेश्वर संदेश (सोलापूर)
ज्ञानेश्वर धुळे – संपादक, साप्ताहिक कारंजा सामना (कारंजा)
डॉ. मेहबूब मालाबोडी – संपादक, डिपार्टमेंट एक्सप्रेस (कर्नाटक)
नारू – ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार, हैद्राबाद (तेलंगणा)
विलासकुमार गणपती सिंधे – संपादक, दैनिक हेज्जे गुरुटू (कर्नाटक)
डॉ. सुरेश चिंचोळकर – संपादक, साप्ताहिक बिरसा वार्ता (यवतमाळ)
आनंद शुक्ला – संपादक, साप्ताहिक जागरण (वर्धा)
श्याम ठेंगडी – ज्येष्ठ पत्रकार, दैनिक तरुण भारत (वरोरा)
*देवदूत पुरस्कार*
डॉ. प्रफुल खुजे – अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय वरोरा
या राज्यस्तरीय अधिवेशनाला यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम वाडकर, राष्ट्रीय सचिव ईश्वरशिंग, राष्ट्रीय कार्याध्यक्ष योगेश तुरेराव, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संतोष धरमकर, राज्य सचिव आशिष घुमे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष जीवन बागडे आणि अभिषेक भागडे यांनी राज्यभरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.



