▪️जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत शहीद बाबुराव शेडमाके विद्यालयाचा संघ जिल्ह्यात अवल..

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्यूज ) : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुलन कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत शहीद बाबुराव शेडमाके माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय मुलचेरा संघाने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविले दिनांक १८ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय व्हालीबॉल स्पर्धेत जिल्हा क्रीडा संकुलन कॉम्प्लेक्स च्या मैदानावर तालुक्यातून प्रथम आलेल्या ८ संघाने सहभाग घेतला होता त्यात शहीद बाबुराव शेडमाके उच्च व माध्यमिक विद्यालय मुलचेरा संघाने उपांत्यपूर्व सामन्यात गडचिरोली येथील एकलव्य विद्यालयाच्या संघाला सिरोंचा येथील राजे धर्मराव विद्यालयाच्या व्हॅलीबॉल संघाविरुद्ध मुलचेरा संघाने उत्कृष्ट सामन्यात जिद्द चिकाटी व अथक परिश्रमाने उपांत्य सामन्यात अव्वल स्थान पटकाविले या संघात प्रतीक आत्राम- कर्णधार- विशाल आलाम,साहील कडते, आदर्श गुट्टेवार,अमित आलम,सागर मेश्राम,पियुष आलाम, क्रिश कोंडरावर,आदित्य कडते,सुमित तोरे, सुरज कंटीवार,या खेळाडूंनी सहभाग घेतला या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून प्राध्यापक किशोर पोहनकर यांनी संघ बांधणी केली. शाळेचे प्राचार्य डॉक्टर एन आर शेख वन वैभव शिक्षण संस्थाचे उपाध्यक्ष अब्दुल जाकीर अब्दुल हकीम समस्त प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील खेळाडूमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विजयी संघावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.



