▪️बालविकास प्राथमिक शाळेतील शिक्षक विवेक विनोद हरमवार यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली..
▪️मृत्यूचे कारण अजून कळत नाही. मुल पोलीस स्टेशन करीत आहे..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. 9403179727
मूल – ( इंडिया 24न्यूज ) : मूल शहरातील नामांकित बालविकास प्राथमिक शाळेतील शिक्षक विवेक विनोद हरमवार (वय 40) यांच्या निधनाच्या घटनेने शहरात खळबळ उडाली असून शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्यांचे कुटुंबीय काही दिवसांपासून बाहेरगावी होते. आज शाळा सुरू असूनही विवेक हरमवार शाळेत उपस्थित नसल्याचे लक्षात आल्यानंतर सहकारी शिक्षकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. विवेक हरमवार हे शहरातील मनमिळावू, कर्तव्यनिष्ठ आणि शांत स्वभावाचे शिक्षक म्हणून ओळखले जात. त्यांच्या अचानक निधनाने विद्यार्थी, पालक तसेच शिक्षण क्षेत्रात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



