▪️शहीद पोलीस कमांडो दीपक चिन्ना माडावी यांना शासकीय मानवंदना..
▪️उपस्थितांचे डोळे पाणावले, मोठ्या प्रमाणावर अधिकारी व जवानांची उपस्थिती..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : अबुजमाड जंगल परिसरात नक्षल्याविरोधात सुरू असलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान विरगती प्राप्त झालेले सी _६० कमांडो दीपक चिन्ना माडावी यांना दि ,६ फेब्रुवारी रोजी गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयात शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानास अंतिम सलामी देण्यात आली
पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित श्रध्दांजली कार्यक्रमात नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल पोलीस उपमहानिरीक्षक अंकितगोयल केंद्रीय राखीवपोलीस दलाचे उप महानिरीक्षक अजय शर्मा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे अधीक्षक निलोत्पल अपर जिल्हाधिकारी नितिन गावंडे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी कर्मचारी व जवान मोठ्या संख्येने उपस्थि होते सर्व मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पिणकरून शहीद जवानास भावपूर्ण श्रद्धांजलि वाहिली नक्षलविरोधी कारवाईदरम्यान कर्तव्य बजावत असताना शहिद झालेले दीपक चिन्ना माडावी यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान कधीही विसरले जाणार नाही त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात प्रशासन आणि पोलीस दल त्यांच्या पाठीशी उभे असल्याची भवनायावेळी व्यक्त करण्यात आली मानवंना कार्यक्रमानंतर शहिद दिपक चिन्ना माडावी यांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी आहेरी तालुक्यातील त्यांच्या मुळ गावी दामरंचा येथे रवाना करण्यात आले मार्गक्रमणादरम्यानही पोलीस दलाच्या वतीने सन्मान राखण्यात आला
आज मुळगावी होणार अंत्यसंस्कार
अबुजमाड जंगल परीसारात शुक्रवार नक्षल्यासोबत झालेल्या चकमकीत सी -६० कमांडो दीपक चिन्ना माडावी गंभीर जखमी झाले होते तातडीने त्यांना हेलिकाॅप्टरच्या माध्यमातुन भामरागड येथे हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान झालेल्या गंभीर जखमांळेत्यांना वीरमरण आले शहिद दिपक चिन्ना माडावी यानां एक मुलगाआसून तो सेट फ्रॅसिस नागेपल्ली येथे पहिल्या वर्गात शिकत आहे त्याच्य पश्र्वात पत्नी लहान मुलगा आई-वडील आहेत.
शहीद दिपक चिन्ना माडावी यांच्याकडे त्याच्या भावाचा मुलगा अगदी लहानपणापासूनच राहत असून मृतकालाच तो पप्पा म्हणतो सध्या हा मुलगा नागपुर येथे पाचव्या वर्गात शिकत असून तो आल्याशिवाय अंत्यसंस्कार होणार नसल्याचे कळते शहिद दिपक चिन्ना माडावी यांच्या पार्थीवावर शनिवार ७ फेब्रुवारी रोजी मांड्रा (दमरांचा) येथे शासकीय ईतमामात अंत्यंस्कांर होणार आहे.


