आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️प्रभाग क्रमांक ५ मधून उमेदवारीची दावेदारी करणारी कुमुदिनी शरद भोयर

▪️सेवाभाव, शिक्षण आणि समाजकार्याचा सुंदर संगम..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल शहरात कार्यरत असलेली कुमुदिनी शरद भोयर या नावामागे समाजसेवेची एक जिवंत प्रेरणा दडलेली आहे. उच्चशिक्षित, समर्पित आणि कर्तृत्ववान अशा या तरुणीने अल्पावधीतच सामाजिक, पत्रकारितेच्या आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

कुमुदिनी भोयर सध्या प्रेस क्लब मूलच्या सचिव म्हणून काम पाहत आहेत, तसेच स्त्री शक्ती ग्रुप मुलच्या अध्यक्षा म्हणून अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहेत. महिलांच्या स्वावलंबनासाठी, शिक्षणासाठी आणि आरोग्य जागृतीसाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत.

कोरोना काळ हा मानवजातीसाठी कठीण कसोटीचा काळ होता. त्या काळात कुमुदिनी यांनी स्वतः कोरोना बाधित असूनही कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवा केली. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी अनेक रुग्णांना औषधे, अन्न आणि फळांचे वाटप केले. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे त्या स्थानिक नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या.

प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी त्या नेहमी उपलब्ध असतात. गरजू रुग्णांना स्वतः दवाखान्यात घेऊन जाणे, वृद्ध आणि असहाय लोकांना शासकीय योजनांची माहिती देणे, तसेच सवलतीच्या आरोग्य सेवांचा लाभ मिळवून देणे हे त्यांचे दैनंदिन कार्य बनले आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रातही कुमुदिनी भोयर या मूल तालुक्यातील पहिल्या महिला पत्रकार म्हणून ओळखल्या जातात. निडरपणे सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या, स्थानिक समस्यांवर आवाज उठविणाऱ्या आणि सत्याला वाचा फोडणाऱ्या पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे.
कुमुदिनी भोयर या सेवाभावी, शिक्षित आणि संवेदनशील नेत्या म्हणून उदयास येत आहेत.
आज या सर्व कार्याचा विचार करता त्या भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक ५ मधून उमेदवारीसाठी दावेदारी करीत आहेत. त्यांच्या सेवाभाव, नेतृत्वगुण आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या आधारे मतदारांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.