ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आष्टी येथे महामार्गच्या चौपदकरणाचा प्रश्न अधांतरीच ट्रामा केअर सह बायपासची मागणी ऐरणीवर..

 

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : आलापल्ली आष्टी गडचिरोली आणि चंद्रपुर या तिन्ही दिशांना जोडणान्या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या दोन- तीन वर्षापासुन अपघातांचे तांडव सुरू आहे वाढत्या जड वाहतुकीमुळे हा महामार्ग आता डेथ ट्रॅप ठरत असून या वर्षात तर दररोज होणान्या अपघातांमुळे शेकडो नागरिकांनी आपला जीव गमावला आहें मात्र इतक्या गंभीर परिस्थितीनंतरही महार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न अधांतरीच असल्याने या महामार्गाचे चौपदरीकरण कधी होणार?असा अगतिक प्रश्न नागरिकांतुन उपस्थित केला जात आहे
मागील दोन ते तीन वर्षामध्ये अपघाताच्या घटनांमध्ये १०० हुन अधिक नागरिकांनी जीव गमाविला आहे यासोबतच अनेकांनाअपंगत्व आले आहे यासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केआर सेंटर स्थापन करण्याची मागणी सुध्दा वारंवार करण्यात येत आहे मात्र,आरोग्य विभाग व लोकप्रतिनिधींकडुनही यावर सकारात्मक उपाययोजना होत नसल्याने नागरिकातून रोष व्यक्त केलाजात आहे आष्टी आलापल्ली गडचिरोली चंद्रपुर या महामार्गावर जडवाहतुक करणारी वाहने चारचाकी दुचाकी वाहनांसह प्रवाशीवाहतूक करणान्या वाहनांची मोठी वर्दळ असते दिवसेंदिवस या मार्गावरून धावणान्या वाहनांच्या संख्ये लक्षणीय वाढ होत आहे परिणामी महामार्गाचे रुंदीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे तसेच मालवाहु वाहनांसाठी बायपास रस्था निर्माण करण्याची मागणी होत आहे
या उपाययोजना करा; सामाजिक कार्यकर्त्याची मागणी
गेल्या तीन वर्षापासून आष्टीसह परिसारात अपघातांच्या घटना म्हणजे नित्याची बाब ठरत आहेत त्यामुळे अपघातांच्या अप्रिय घटना टाळण्यासाठी लोकप्रतिनिधिच्या पुढाकारातून प्रशासनाने उपाययोजना शोधून तत्काळ कार्यवाही करणे अपेक्षित आहे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतुक नियंत्रक दिवे ( सिग्नल) लावणे,नियमितपणे वाहतूक पोलीसतैनात करणे महामार्गावरील शाळा,महाविद्यालयांजवळ गतिरोधक बनविणे आवश्यक ठरते,वैनगंगा नदी पुलापासून ते पेट्रोलपंप असे २ किमी तसेच चौकापासून अशखोडापर्यत पथदिवे लावा्वे जड वाहतूक करणान्या वाहनांच्या आवगमनाची वेळ निश्चत करावी बायपास रस्ता तयार करावा महामार्गावर नो पार्किग झोन घोषित करावे अशी मागणी सरपंच बेबी बुरांडे जि,प,च्या माजी सदस्य रूपाली पंदीलवार प्रकाश कुकूडकर सामाजिक कार्यकर्ता संजय पंदीलवार अनिल आलुरवार पंकज पंदीलवार यानी केली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.