आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️विसापूरमध्ये उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई टाळण्यासाठी तात्काळ नियोजनाची मागणी..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

बल्लारशा / विसापूर – ( इंडिया 24 न्युज ) : गावात येणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने तात्काळ पूर्वनियोजन करावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष संदीप श्रीहरी पोडे यांनी केली आहे. यासंदर्भात ग्रामसेवकांना लेखी निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, उन्हाळ्याची सुरुवात झाली असून पुढील काही महिन्यांत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी गावातील काही भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवली होती. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता.
यावर्षी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने आताच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे पोडे यांनी सांगितले. पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, विहिरी व बोअरवेलची तपासणी व दुरुस्ती करणे, टँकरची आवश्यकता भासल्यास त्याची व्यवस्था ठेवणे तसेच जलसाठ्याचे योग्य नियोजन करणे या उपाययोजना तातडीने करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागू नये, ही ग्रामपंचायतीची प्राथमिक जबाबदारी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले असून या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन ही समस्या तात्काळ सोडववी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.