आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मातृस्मृतीस सामाजिक उपक्रमाची जोड: स्व. सुमनबाई गोलेपल्लीवार

▪️यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप..

 

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

जिबगाव – ( इंडिया 24 न्युज ) : (दि. १० ऑगस्ट २०२६): आपल्या दिवंगत आईच्या स्मृती जपणे आणि त्यांच्याप्रति आदर व्यक्त करणे ही प्रत्येकाची भावना असते; परंतु या भावनेला सामाजिक बांधिलकीची जोड देऊन समाजातील गरजू घटकांसाठी कार्य करणे हीच खऱ्या अर्थाने खरी आदरांजली ठरते. असाच एक कौतुकास्पद व आदर्शात्मक उपक्रम जिबगाव येथे नुकताच पार पडला.
ग्रामपंचायत जिबगावचे सदस्य श्री. राकेश गोलेपल्लीवार व श्री. उमेश गोलेपल्लीवार यांच्या मातृश्री स्व. सुमनबाई मधुकर गोलेपल्लीवार यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून जिबगाव येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक बॅग (शालेय दप्तर) वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. सुमनबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अत्यंत भावपूर्ण वातावरणात आणि भक्तीमय वातावरणात ‘भजन संध्या’ व धार्मिक विधी पार पडले. धार्मिक विधींनंतर सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जपत गावातील लहान विद्यार्थ्यांना नवीन व आकर्षक शालेय बॅग्स वितरित करण्यात आल्या. नवीन दप्तर हातामध्ये मिळताच लहानग्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला.
केवळ कौटुंबिक किंवा धार्मिक विधींपुरते मर्यादित न राहता बालकांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य ठरला आहे. या उपक्रमातून गोलेपल्लीवार कुटुंबाने समाजासमोर एक नवा आणि आदर्श पायंडा घालून दिला आहे.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य श्री. राकेश गोलेपल्लीवार, उमेश गोलेपल्लीवार यांच्यासह गोलेपल्लीवार व गडमवार परिवारातील सदस्य, विजय गड्डमवार, सुधाकरजी गडपल्लीवार, दिलीपजी गडपल्लीवार, प्रकाश पाटील मारकवार, निरंजन पा वासेकर, अविनाश तालापल्लीवार यांच्यासह परीवार सदस्य मान्यवर गावातील मान्यवर नागरिक, महिला व मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी गोलेपल्लीवार कुटुंबाच्या या स्तुत्य उपक्रमाचे मनापासून कौतुक केले व स्व. सुमनबाई गोलेपल्लीवार यांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण के

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.