▪️पावसाळा संपूनही चामोर्शी ते हरणघाट रस्त्याचे काम नाही, केव्हा सुरू करणार?
▪️चामोर्शी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सचिव संतोष कटारे यांची मागणी.. त्या खड्डेमय रस्त्यामुळे वाहन धारकांची व सामान्य माणसाची दमछाक..

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी : ( इंडिया 24 न्युज ) : चामोर्शी ते मुल रस्त्यावर मोठ मोठी खड्डे पडले असल्याने वाहन धारक व सामान्य माणसाला मोठी दमछाक होत असून तो रस्ता पावसाळा संपूनही अद्याप काम सुरू करण्यात आला नाही, केव्हा सुरू करणार असा प्रश्न येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे गडचिरोली जिल्हा चामोर्शी सचिव संतोष कटारे यांनी विचारणा केली आहे
चामोर्शी ते हरणघाट रस्ता
गेल्या काही वर्षांपासून सतत पाठपुरावा केल्याने बांधकाम झाले पण जड वाहतुकीने व इतर कारणाने तो खड्डेमय झाला तर पावसात त्या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचले होते त्यामुळे वाहन धारकांना व सामान्य माणसाला मोठी दमछाक होत होती तर त्या रस्त्यावर बरेच लहान मोठे अपघात सुध्दा झाले. मात्र या
रस्त्याकडे संबंधित विभाग, शासन,जिल्हा प्रशासन,लोकप्रतिनिधी
कानाडोळा करीत आहे
त्या मार्गाने जड वाहतूक होत असल्याने त्या जड वाहतुकीचां वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असून त्या रस्त्याची वाट लावली जात आहे
सदर रस्ता नव्याने बांधकाम करण्यासाठी मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे तर मंजूर झाले तर बांधकाम केव्हा सुरू करणार असा प्रश्न उपस्थित करत तो रस्ता नव्याने बांधकाम सुरू करावेत अशी मागणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष गडचिरोली जिल्हा चामोर्शी सचिव संतोष कटारे यांनी केला आहे



