ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️राष्ट्रीय आदिवासी नाट्य महोत्सवात घायाळ पाखराचा ५७७ वा प्रयोग..

▪️धरती आबा बिरसा मुंडा व क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवन कथेने भारावले प्रेक्षक..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्य सभागृहात १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान आयोजित राष्ट्रीय आदिवासी नाट्य महोत्सवाचा भव्य समारोप झाला या तीन दिवसीय महोत्सवाने आदिवासींचा संघर्ष त्यांचे स्वप्न आणि त्यांचा शौर्य गौरव रंगमंचावर प्रभावीपणे उभा केला समारोपीय नाटक म्हणून डॉक्टर अनिरुद्ध वनकर लिखित दिग्दर्शित व निर्मित घायाळ पाखरा या नाटकाचा 577 वा प्रयोग झाला दोन तास चाललेल्या या नाटकाने प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले आणि सभागृहात सतत टाळ्यांचा कडकडाट घुमत राहिला. तीन दिवसीय आदिवासी नाट्य महोत्सवामध्ये रसिकांसाठी प्रेरणादायी नाटके ठरलीत पहिल्या दिवशी धरतीय व बिरसा मुंडा या क्रांतिकारकाच्या जीवनावर आधारित नाटक सादर झाले लेखक चुडाराम बल्हारपुरे यांनी हे नाटक रचले असून स्वातंत्र्यासाठी चे त्यांचे योगदान रंगमंचावर जिवंत करण्याचे काम दिग्दर्शनाच्या माध्यमातून डॉक्टर अनिरुद्ध वनकर यांनी केले दुसऱ्या दिवशी गोंडवानाचा महायुद्धा वीर बाबुराव शर्मा के क्रांती नाट्य रंगवण्यात आले आणि त्याचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि लेखणीतून नाटक प्रेक्षकांच्या हृदयाला भिडले महोत्सवाच्या समारोपाला घायाळ पाखरा या नाटकाने गर्दीने खचाखच भरलेल्या सभागृहाला अक्षरशः मंत्रमुग्ध केले आदिवासी समाजाचा हक्क न्याय समता आणि स्वातंत्र्यानंतर सुरू राहिलेल्या अंधकारमय जीवनाचे वास्तव डॉक्टर अनिरुद्ध वनकर यांनी स्वतःच्या लेखणीतून दिग्दर्शनातून आणि अभिनयातून प्रभावीपणे रंगविले

रंगमंचीय मांडणी व कलाकारांची साथ.
नेपथ्य नरेंद्र रामटेके यांनी प्रकाश योजना अनिल दुधाटे यांनी तर संगीत लोकेश दुर्गे ईश्वर खोब्रागडे आणि विपिन राऊत यांनी केले रंगमंचावर सेने अभिनेता भारत रंगारी प्रवीण बसारकर प्रमोद दुर्गे जुगलगणवीर अखिल भसारकर संजीव रामटेके रूपाली खोब्रागडे नयना खोब्रागडे अंकुश शेडमाके निखिल मानकर रवींद्र धकाते शुभांगी राऊत गौतम डेंगळे योगेश राऊत संगीता टेकाडे अनिल डोंगरे सुरेश खोब्रागडे विजय गुरुमुळे वैभव मगरे स्नेहल वाडगुरे प्रियंका सीडाम, कुमकुम तिवारी ,आणि बाल कलावंत म्हणून निनावे आणि डॉक्टर अनिरुद्ध वनकर यांच्यासहित शंभराहून अधिक कलाकाराने सहभाग नोंदविला कलाकारांच्या अभिनयाने सभागृहातील प्रेक्षकांना प्रत्यक्ष आणि खेळवून ठेवण्यामागे हे नाट्य महोत्सव यशस्वी ठरले.
गौरव ग्रंथ प्रकाशन
समारोप प्रसंगी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या जीवनावर आधारित गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाला डॉक्टर सदा भडके व डॉक्टर देवेश कांबळे यांनी संपादन केले होते आणि प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
महोत्सव यशस्वी करणारे हात
या तीन दिवसीय नाट्य महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी नरेंद्र रामटेके लीनाधर वाकडे बाळू आंबेकर भारत रंगारी मुकेश वाळके नलिनी मॅडम मीनाक्षी वाळके सचिन फुलझेले अनिकेत दुर्गे बाबुराव जुमनाखे शुद्धधन मेश्राम,सुखदेव सर विजय वनकर गुरुजी सुधीर जांभुळकर जी अनिल डोंगरे अधिक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. या राष्ट्रीय आदिवासी नाट्य महोत्सवाने चंद्रपूरकरांना एक अनोखा नाट्य महोत्सवी अनुभव दिला तिन्ही नाटकांनी प्रेक्षकांच्या मनात प्रेरणा अभिमान आणि भावनांचे वादळ निर्माण केले असे तीनही नाटकांचे दिग्दर्शक डॉक्टर अनिरुद्ध वनकर यांनी सांगितले .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.