आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️स्थानिक गणेश चौकात श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

यवतमाळ – ( इंडिया 24 न्युज ) : स्थानिक गणेश चौकात श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सकाळी 6 ला श्रींचा अभिषेक आणि कालाप्रसाद वितरित करण्यात आले त्यानंतर सुंदरकांडचे पाठपूजन करून श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यांत आला. यावेळी विविध मंडळ आणि समाजिक बांधिलकी जपणाऱ्या भक्तांचे मोठे योगदान लाभले. सायंकाळी भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री हनुमान मंदिर गणेश चौक आणि आझाद दुर्गादेवी उत्सव मंडळ , गणेश व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जन्मोंउत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी जन्मोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. तर सायंकाळी भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री हनुमान मंदिर गणेश चौक, आझाद दुर्गादेवी उत्सव मंडळ,गणेश व्यायाम शाळा यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.