▪️उशिरा शाळेत येणारे जि. प. शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक निलंबित..
▪️मा.मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी केली कार्यवाही..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : शाळेच्या वेळेचे उल्लंघन करणे दोन शिक्षकांना चांगलेच भोवले.मूल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा बेलघाटा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी भेट दिली असता दोन शिक्षक शाळेच्या वेळेनंतर हजर झाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी गंभीरपणे विचार करून शाळेत उशिरा येणारे शाळेचे मुख्याध्यापक आणि साहाय्यक शिक्षक यांच्यावर थेट निलंबनाची कार्यवाही केली.
निलंबित शिक्षकांना सावली पंचायत समितीमध्ये हजेरी लावावी लागणार आहे.सदर कार्यवाही २३ जुलै रोजी करण्यात आली असून शिक्षकांमध्ये खळबळ माजली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह हे काही दिवसांपासून जिल्ह्यातील पंचायत समिती,शाळा,आरोग्य केंद्र यांना भेटी देत आहेत. सदर निलंबनामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
जनतेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केलेल्या कार्यवाहीचे समर्थन केले जात आहे.
जिह्वा परिषद चंद्रपूर अंतर्गत विविध कार्यालयात कर्मचारी व अधिकारी यांचे उशिरा येणे,कार्यालयीन वेळेत चहा टपरीवर वेळ घालविणे आणि कार्यालयीन वेळेच्या अगोदर कार्यालयातुन निघून जाणे अशी बहुतेक कर्मचाऱ्यांची/ अधिकाऱ्यांची दिनचर्या असल्यामुळे सामान्य जनतेचे काम होत नसल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कार्यवाहीचा रोख वाढवून कर्मचाऱ्यांवर जबर बसवून कामकाजात पारदर्शकता आणावी आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीला लगाम लावावा असे जनतेकडून बोलले जात आहे.
जनतेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केलेल्या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.