▪️३० जुलै रोजी राजुरा, घुग्घूस व पोंभुर्णा येथे मोफत भव्य महाआरोग्य शिबीर..
▪️नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आमदार देवराव भोंगळे यांचे आवाहन!

मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभुळकर
राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : दि. २६ राजुरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याचे माजी मंत्री, आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ३० जुलै रोजी जिल्ह्यात राजुरा, घुग्घूस व पोंभुर्णा येथे भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.
या शिबिरामध्ये जवळपास सर्वच प्रकारच्या आजारांचे निदान, उपचार व शस्त्रक्रिया मोफतपणे करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
सदर शिबीर राजुरा येथे महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात तर घुग्घूस येथे प्रयास सभागृहात आणि पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात संपन्न होणार असून सकाळी ०९ वाजेपासून सुरू होणार आहेत.
याठिकाणी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर, आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी मेघे, एन.सी.आय. कॅन्सर हॉस्पिटल नागपूर, शालिनीताई मेघे हॉस्पिटल वानाडोंगरी, नागपूर, ग्रामीण रुग्णालय राजुरा, घुग्घूस व पोंभुर्णा येथील मेडिसीन, नेत्ररोग, सर्जरी, बालरोग, स्त्रिरोग, कान-नाक-घसा, अस्तिरोग, त्वचारोग आणि कॅन्सर यांसारख्या रोगांवरील तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार असून याठिकाणी सर्व चाचण्या व मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात येणार आहे.
त्यासाठी राजुरा व पोंभुर्णा तालुक्यातील नागरिकांसह घुग्घूस शहर परिसरातील नागरिकांनी सदर शिबीरांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक तथा आमदार देवराव भोंगळे यांनी केले आहे.