आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️भवराळाची ग्रामसभा ठरली वादळी..

▪️ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी दिली अफरातफरीची लेखी कबुली..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : मुल भवराळा ग्रामपंचायतमध्ये सन-२०२१,२०२२,२०२३,
२०२४,२२०२५ मध्ये आराखडानुसार मंजूर कामे झाली. मात्र ते प्रत्यक्षात झाले नसल्याने ग्रामपंचायत सदस्यांच्या लक्षात येताच सदस्यांनी ग्रामसभेचे आयोजन करून ग्रामपंचायत पैशाची उचल कशी केली असे अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मी अफरातफर केली असे लेखी कबुली दिली असून भरपाई करून देणार असल्याचे सांगून ग्रामसभेत वाचुन दाखविण्यात आल्याने प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कामे जन्माच्या आधीच पैशाची उचल करून बांधकामाची तेरवी देण्याचा प्रकार भवराळा ग्रामपंचायतमध्ये दिसून आला. ग्रामसभेला गावातील बहुसंख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.
मूल तालुक्यातील भवराळा ग्रामपंचायतमध्ये सात सदस्य संख्या आहे.बहुतेक शेतकरी व मजूर वर्गातील नागरिक असल्याने आपापल्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या विश्वासावरच ग्रामपंचायतमध्ये कारोभार चालत होता. मासिक बैठकीचे आयोजन करण्यात येत होते.परंतु बहुतेक मासिक बैठकीला ग्रामपंचायत अधिकारीच हजर राहत नसल्याने मासिक मिटिंग रद्द होत होत्या. गाव विकासावर तोंडी चर्चा चालत असल्याने सदस्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतीवरील मजुरी कामाला जात असल्याने सपशेल दुर्लक्ष झाले होते.
याचाच गैरफायदा घेत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मंजूर झालेली कामे दाखवून कामे पूर्ण झाले म्हणून पैशाची उचल बऱ्याच वर्षांपासून करीत होते. मात्र येथीलच एका ग्रामपंचायत सदस्यांनी ऑनलाइन पैशाची उचल ग्रामपंचायत अधिकारी करीत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिली.त्यामुळे गावकऱ्यांनी ग्रामपंचायतची ग्रामसभा घेण्यात यावी अशी मागणी रेटून धरली.त्याप्रमाणे आज दिनांक २८/०८/२०२५ गुरुवारी १२ वाजता ग्रामसभेचे आयोजित केली होती.बहुतेक ग्रामस्थांनी हजेरी लावली.कोरम पूर्ण झाल्याने ग्रामसभेला सुरुवात झाली.अंदाजपत्रकप्रमाणे कामे वाचूण कामे पूर्ण झाली का?असे ग्रामसभेत वाचन सुरू होताच.ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची बनवाबनवी ग्रामस्थांच्या लक्षात येताच. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात अफरातफर केल्याची कबुली दिल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.