▪️गॅस दरवाढीच्या विरोधात मूल तालुका काँग्रेस निषेध..
▪️मूल शहरात त्वरित गॅस एजन्सी मंजूर करावी : संतोषसिंह रावत

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : शासनाने गॅस सिलेंडरच्या दरामध्ये अचानकपणे फार मोठी वाढ केलेली असून गॅस सिलेंडरच्या नोंदणीचा कालावधी सुध्दा वाढविला आहे. याचा विपरीत परिणाम राज्यातील प्रत्येक कुटुंबावर झालेला आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्या शासनाने मोठ्या प्रमाणात गॅस दरवाढ करून जनतेचा विश्वासघात केला आहे. या विरूध्द काँग्रेस पक्षातर्फे आंदोलनात्मक कार्यक्रम हाती घेण्यात आला असून मूल तालुका काँग्रेसतर्फे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व माजी जि.प. अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे मार्गदर्शनाखाली गॅस दर वाढीबाबत निषेध नोंदवत जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी मान.अजय चरडे यांचे मार्फतीने निवेदन देऊन सिलेंडरची भाव वाढ कमी करावी अशी मागणी केली आहे.
उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देताना तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, शहर अध्यक्ष सुनील शेरकी,नगराध्यक्षा सौं.एकता समर्थ, महिला काँग्रेस जिल्हा महासचिव घनश्याम येनुरकर,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपनगराध्यक्ष राकेश रत्नावार, महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार, माजी पं.समिती सभापती वैशाली पुलावार, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, पाणी पुरवठा सभापती विलास कागदेलवार, शिक्षण सभापती लीनाताई फुलझेले, महिला बाल कल्याण सभापती नलिनी आडपवार, उपसभापती समीक्षा कडसकर,नगर सेवक अतुल गोवर्धन,नितीन गद्देवार, बंडूभाऊ गुरनुले, अशोक येरमे, विवेक मूत्यलवार, राहुल प्रेमलवार, तुकाराम गुरनुले,माजी उपाध्यक्ष चंदु चटारे,डेव्हिड खोब्रागडे, इंटकचे जिल्हाध्यक्ष दत्तू समर्थ,काँग्रेस कार्यकर्ते श्री.निकुरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
मूल नगराची लोकसंख्या ३५ हजार आहे. तालुक्यात १०३ गावे आहेत. ग्रामपंचायतीची संख्या ४९ असून मूल शहर राज्याचे मुख्यमंत्री नाम.देवेन्द्रजी फडणवीस यांचे आजोळ आहे. हे राजकीय व व्यावसायिक दृष्ट्या संवेदनशील आहे. असे असताना मूल नगरात अधिकृत गॅस एजन्सी नाही.त्यामुळे असंख्य ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळत नाही.नेहमीच सिलेंडरचा तुटवडा असते. याचा स्वयंपाक करणाऱ्या गृहिणींना खूप त्रास सहन करावा लागत आहे. करिता मूल शहरात शासनाने त्वरित गॅस एजन्सी मंजूर करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस संतोषसिंह रावत यांनी केली आहे.
प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत व तालुका काँग्रेसने गॅस दर वाढ व एजन्सी बाबत दिलेले निवेदन उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांनी तात्काळ शासनाकडे निवेदन पाठऊन त्याची प्रत काँग्रेस कामेटीकडे तात्काळ दिले.याबद्दल कमिटीने उपविभागीय अधिकारी यांचेप्रती आभार मानले.


