▪️निवडणूकीत हातानी भरलेले रकाने असे फार्म रद्द करा. सुरेश मल्हारी पाईकराव यांची मागणी..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
घुग्घुस – ( इंडिया 24 न्युज ) : सार्वत्रिक स्थानिक स्वराज्य निवडणूक नगर परिषद घुग्घुस 2025 मधील भरलेले फार्म रद्द करण्याची मागणी आज दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी आजाद समाज पार्टीचा वतीने करण्यात आली.
सार्वत्रिक स्थानिक स्वराज्य नगर परिषद निवडणूक घोषित झाल्या असुन घुग्घुस नगर परिषद येथे सुध्दा पहिली नगर परिषद निवडणूक असल्याने घुग्घुस मध्ये सर्व पक्ष- अपक्ष उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले.
नामनिर्देशनपत्राची प्रक्रीया हि ऑनलाईन फार्म भरुन दाखल करण्याची होती. त्या मध्ये निवडूणक आयोगाचा शासकीय नियमानुसार सर्व रकाने भरणे अनिवार्य असुन सुद्धा फक्त सहा नामनिर्देशनपत्राचे अर्ज पुर्ण रकाने भरले आहे.
इतर सर्व नामनिर्देशनपत्राचे रकाने हे खाली असुन. खाली रकाने ऑनलाईन अर्ज हातानी भरुन त्यांचे नामनिर्देशनपत्र फार्म वैध करण्यात आले.
आजाद समाज पार्टीचा वतीने जिल्हाधिकारी चंद्रपूर निवडणूक अधिकारी घुग्घुस यांना निवेदनाद्वारे
मागणी करण्यात आली. की
नामनिर्देशनपत्रातील रकाने हाताने भरुन ते सर्व नामनिर्देशनपत्र लवकरात लवकर रद्द करण्यात यावे.
यावेळेस सुरेश मल्हारी पाईकराव यांनी
मुख्याधिकारी नगर परिषद घुग्घुस तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी निलेश रंजनकर यांच्याशी चर्चा केली असता. हाताने फार्म भरलेले अर्ज कसे काय वैध करण्यात आले. मुख्याधिकारी यांनी तोडी उत्तर देत त्यांना फार्म भरता येत नव्हता म्हणून त्यांना हाताने भरायला सांगितला. पाईकराव यांनी मुख्याधिकारी यांना विचारले ऑनलाईन फार्म हाताने भरता येतो असा शासन निर्णय किंवा आदेश आला आहे काय शासन निर्णयाची आम्हाला सत्यप्रत द्यावे त्यावर मुख्याधिकारी यांनी सायंकाळपर्यंत शासन निर्णय देऊ असे सांगितले.
जर लवकरात लवकर हाताने भरलेले रकाने हे फार्म किंवा नामनिर्देशनपत्र रद्द करण्यात आले नाही तर
निवडणूक आयोगाने आपल्या पदाचा गैरवापर केला बद्दल आजाद समाज पार्टीच्या वतीने तीव्र भुमिका घेऊन आंदलने करु
असा इशारा देखील आज सुरेश मल्हारी पाईकराव यांनी दिला आहे.



