▪️माजी जिल्हा परिषद अध्यक्षां व भाजप नेते यांच्या निवासस्थानी सापडल्या दारूच्या पेठ्या..
▪️चामोर्शी पोलिसांची मोठी कार्यवाही..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांच्या घरी तब्बल ४५ पेट्या दारू सापडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचे नेते तसेच भाजपा युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या वालसरा (ता. चामोर्शी) येथील निवासस्थानी पोलिसांनी मंगळवारी पहाटे छापा टाकला.
या छाप्यात देशी दारूच्या पेट्या जप्त करण्यात आल्या असून, पोलिसांनी एकूण ४५ पेट्या दारू जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात तसेच समाजमाध्यमांवर मोठी चर्चा रंगली आहे.
चामोर्शी पोलिस ठाण्यातून प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणी भाजप युवा आघाडीचे चामोर्शी तालुका उपाध्यक्ष यांचे लहान बंधू , यांच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आगामी निवडणुका लक्षात घेता, इतक्या मोठ्या प्रमाणात दारूचा साठा भाजप नेत्यांच्या घरी सापडल्याने, ही दारू मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरण्यात येणार होती काय? असा प्रश्न समाजमाध्यमांवरून तसेच स्थानिक राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
“दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात भाजपचेच नेते अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करतात, हे जनतेस दिशाभूल करणारे आहे,” अशी प्रतिक्रिया समाज माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे.



