आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️झुरळं जनता पार्टीचे 6 जून रोजी पिंपरीत “बेरोजगार एल्गार” धरणे आंदोलन तरुणांच्या 10 न्याय्य मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

पिंपरी – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 05/06/2026: पिंपरी चिंचवड शहरातील लाखो सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘झुरळं जनता पार्टी’ तर्फे दि. 06 जून 2026, शनिवार रोजी सकाळी 10 ते सायं 5 या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे ‘बेरोजगार एल्गार’ धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

या आंदोलनाची पूर्वसूचना व 10 प्रमुख मागण्यांचे निवेदन आज मा. तहसीलदार, हवेली तालुका, पिंपरी चिंचवड यांना सादर करण्यात आले.

‘झुरळं जनता पार्टी’चे संस्थापक मा. अभिजीत दीपके यांनी सांगितले की, “पेपरफुटीमुळे हजारो तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. भरती रखडल्या आहेत. वय निघून चालले आहे. घरात ‘बेरोजगार’ म्हणून हिणवले जात आहे. आता गप्प बसून चालणार नाही. शांततामय लोकशाही मार्गाने आम्ही आमचा हक्क मागणार आहोत.”

*आंदोलनातील प्रमुख 10 मागण्या:*
1. *जबाबदारी निश्चित करा:* पेपरफुटीला जबाबदार यंत्रणेवर कठोर कारवाई करून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा.

2. *कठोर शिक्षा:* पेपरफोड्यांवर MCOCA अंतर्गत कारवाई करून 10 वर्ष शिक्षा व 10 लाख दंड ठोठवावा.

3. *त्वरित भरती:* केंद्र व राज्य शासनाच्या सर्व रिक्त जागा 6 महिन्यात भराव्यात.

4. *बेरोजगार भत्ता:* 18 ते 35 वयोगटातील सर्व बेरोजगारांना दरमहा ₹5000 भत्ता सुरू करावा.

5. *परीक्षा फी माफ:* MPSC, पोलीस, शिक्षक भरतीसह सर्व स्पर्धा परीक्षांची फी पूर्णपणे माफ करावी.

6. *कायमस्वरूपी नोकऱ्या:* कंत्राटी भरती पद्धत रद्द करून कायमस्वरूपी नोकरभरती करावी.

7. *तक्रार हेल्पलाईन:* भरतीतील घोटाळ्यांसाठी 24×7 हेल्पलाईन सुरू करावी.

8. *स्किल + नोकरी:* सर्व बेरोजगारांना नोकरीची हमी असलेले मोफत कौशल्य प्रशिक्षण द्यावे.

9. *आंदोलनाचा हक्क:* शांततामय आंदोलन करण्याचा घटनात्मक हक्क अबाधित ठेवावा.

10. *संरक्षण द्या:* आंदोलनाचे नेतृत्व करणारे मा. अभिजीत दीपके यांना योग्य पोलीस संरक्षण द्यावे.

“हे आंदोलन 100% शांततेत व कायद्याचे पालन करून होईल. झेंडे, बॅनर घेऊन या. एक दिवस स्वतःसाठी द्या. नोकरी नसेल, पेपर फुटला असेल, भविष्य वाचवायचे असेल तर 6 जूनला पिंपरीत या,” असे आवाहन झुरळं जनता पार्टीने केले आहे.

*‘नोकरी नाही तर मतदान नाही’* हा आमचा नारा आहे.

*स्थळ:* डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी
*दिनांक व वेळ:* शनिवार, 06 जून 2026, सकाळी 10 ते सायं 5

अधिक माहितीसाठी संपर्क:
*एक बेरोजगार तरुण*
झुरळं जनता पार्टी, पिंपरी चिंचवड
संपर्क: 9595952102

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.