▪️लोकप्रतिनिधिंच्या हस्ते वृक्षारोपणाने साजरा झाला वृक्षाईचा स्थापना व ट्री बॉय अजिंक्यचा 30 वा जन्म दिन..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
चंद्रपूर- ( इंडिया 24 न्युज ) : 5 जुन 2026 जागतिक पर्यावरण दिन,वृक्षाईचा स्थापना दिन व पर्यावरण दिनाचा आपला प्रत्येक जन्मदिन महानगरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करुन साजरा करणाऱ्या ट्री बॉय अजिंक्य कायरकरचा 30 वा वाढदिवसही वृक्षारोपनणाने चोराळा पुला मागे इरई नदी काठावर अतिशय शुद्ध हवा,वृक्षाईने नटलेल्या,स्वच्छ व मन प्रसन्न,शांत वातावरण असलेल्या रुईबन हनुमान मंदिर परिसरात हा सामाजिक कार्यक्रम 30 झाडं लावून संपन्न झाला.
या राष्ट्रीय कार्यक्रमाला चंद्रपूरच्या महापौर संगिता खांडेकर,मनपा स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे, नगरसेविका सोफिया खान,वडगाव प्रभागच्या नगरसेविका मनीषा बोबडे,प्रतीक्षा येरगुडे,नगर सेवक पप्पू देशमुख यांच्या व जेष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना संगिता खांडेकर यांनी वाढत असलेले प्रदूषण व अतिउष्णता रोखण्यासाठी ट्री बॉय अजिक्य प्रमाणे चंद्रपूरातील जनतेने घर-आंगण,रस्त्याच्या कडेला,बगिचे व मोकळ्या जागेत झाडं लावण्याचे आव्हान केले.मनस्वी गिऱ्हे यांनी तापमान वाढ रोखण्यासाठी जनतेला वृक्षारोपण करण्याची विनंती करीत इरई नदी रुंद-खोल करण्यासाठी सर्व मनपा पदाधिकारी-नगरसेवक,इरई खोलीकरण समिती प्रामाणिक पने कार्य करण्यासाठी इच्छुक व कृतसंकल्प असल्याचे सांगितले.पप्पू देशमुख यांनी पर्यावरण दिनी अजिंक्यचा जन्म व त्याची लहानगी बहीण भुमीचा कृषी दिनी झालेला जन्म दुर्मिळ व निसर्ग योग असून निसर्ग त्याचे रक्षण कायरकर परिवार,त्यांच्या वृक्षाई व इरई बचाव जणांदोलना द्वारे करुन घेत असल्याचे मत व्यक्त केले.या वृक्षारोपणासाठी रुईबन हनुमान मंदिराचे विश्वस्त अशोक अंबिरवार,वतन राऊत,संजय सोनटक्के,किशोर आंबेकर,पांडुरंग मुरकुटे, सुभाष चव्हाण,हेमराज टेकूलवार,गुड्डू दुर्सेलवार,नत्थू आवारी,विजय पुजारी,विजय जिझीलवार,विजय बोडणे,संतोष मेश्राम,बंडू गर्गेलवार,धोपटे,राकेश बुटले,डाखोरे,अमित भिवदरे,युवराज बनकर,नरेश आंबेकर,अमित बनकर, अडकूजी उसगांवकर,किशोर पडगेलवार,अनिल सहारे, संतोष वडपल्लीवार,वसंत निंबाळकर,मुरलीधर साखरकर,राजू साडीक,कैलास संगेवार सह अजिंक्यची आई प्रतिभा,बहीण भुमी कायरकर,शिक्षिका रमा देशमुख,विठाईचे महेश व मिथिलेश काहीलकर,जनविकास सेना,इरई(नदी) बचाव जनआंदोलन व वृक्षाई व रुईबान हनुमान मंदिरच्या विश्वस्ताचे सहकार्य लाभले.


