आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️दुर्गापुर ग्रामपंचायत सचिव तथा सरपंच यांना चित्तरंजनपूर व्यापारी संघटनेने दिले निवेदन..

▪️आठवडी बाजारात जडवाहनाची वाहतूक रोखण्याबाबत नागरिकांना त्रास सहन करावा..

 

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ: उज्वल देवानाथ

चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) :
चामोर्शी तालुक्यातील मौजा चित्तरंजनपूर येथील बाजार रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात जड वाहनांची ये-जा होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करत गावकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, चित्तरंजनपूर बाजार रोड हा गावातील प्रमुख मार्ग असून याच मार्गावरून नागरिक, विद्यार्थी तसेच शेतकरी नियमित ये-जा करतात. मात्र बाजार समितीमध्ये येणाऱ्या जड वाहनांमुळे रस्ता वारंवार अडवला जात असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा रस्ता पूर्णपणे बंद होत असल्याने अपघाताचा धोका वाढला असून लहान मुलांनाही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.